एपीआय सुशील भोसले यांच्या टीमचा रेशन माफियांना मोठा दणका | Api sushil bhosales team big action against ration mafias | Ration grains worth Rs 09 lakh seized

काळ्या बाजारात विक्री जाणारा 09 लाखांचा रेशनचा माल केला जप्त

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Solapur Crime News | मोडनिंब बाजारात समितीतून (Modnimb Market Committee) काळ्या बाजारात विक्रीस जाणारा लाखो रूपये किमतीचा रेशनचा माल पकडण्याची धडाकेबाज कारवाई टेंभुर्णी पोलिसांनी पार पाडली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या पथकाने केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tembhurni police have taken action against rations worth lakhs of rupees being sold on the black market)

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील मोडनिंब बाजार समितीतील एका आडत दुकानातून रेशनिंगचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असून हा माल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती टेंभुणीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या पथकाने संबंधित आडत दुकानावर धाड टाकली.

यावेळी गोरख पांडुरंग सुर्वे या आडत दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये रेशनच्या गव्हाच्या गोण्या भरल्या जात असतानाच पोलिसांनी रेशनचा लाखो रूपये किमतीचा माल रंगेहाथ पकडला. त्यानंतर पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक निंबाळकर, तहसीलदार राजेश चव्हाण, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार यांना सदर घटनेची माहिती कळवली.

पोलिस व महसुल पथकाने गव्हाचे वजन केले असता 4 लाख 25 हजार रुपये किमतीचा 25 हजार 80 किलो गहू, तसेच गोडावूनमधील 350 गोण्यांमध्ये अंदाजे 20 टन म्हणजे 3 लाख 40 हजार रुपयांचा गहू व 1 लाख 79 हजारांचा 150 गोण्यांमधील 12 टन तांदूळ जप्त केला. या गोण्यांची तपासणी केली असता त्यावर ‘गव्हर्नमेंट ऑफ पंजाब’ असा शिक्का आढळूला. पुरवठा निरीक्षक कुंठलवार, तलाठी वैभव पाटील, महेश राऊत, राजेंद्र चव्हाण यांनी ट्रक व गोडावूनमधील गहू, तांदळाची तपासणी केली. महसुल व पोलिस पथकाने संयुक्त पंचनामा करत एकुण 9 लाख 44 हजार रुपये किंमतीचा रेशनचा माल टेंभुर्णी पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोडनिंब बाजार समितीतील गोरख पांडुरंग सुर्वे आडत दुकानाचे मालक सतीश माणिक सुर्वे (रा. बैरागवाडी, ता. माढा ), ट्रकचालक रामेश्वर भगवान देठे (वय 23, रा. बीड), क्लीनर तुषार गोवर्धन फड (वय 21, रा. बीड) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रेशनमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (Api sushil bhosales team big action against ration mafias Ration grains worth Rs 09 lakh seized)

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करत आहेत.

web title: api sushil bhosales team big action against ration mafiasn Ration grains worth Rs 09 lakh seized