Bank robbery news | पिंपरखेडमधून 2 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल लंपास : बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी लुटली बँक
पुणे : Bank robbery news | पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून बंदुकीच्या धाकावर बँक लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या दरोड्यात तब्बल दोन कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला आहे. (Bank robbery news, Bank of Maharashtra, Pimparkhed branch, Shirur taluka,looted by robbers at gunpoint, property worth Rs 2 crore 31 lakh looted)
ही घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर घडली. भरदिवसा दरोडा पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहकदेखील उपस्थित होते. (Daytime robbery at Bank of Maharashtra branch in Pimparkhed village in Shirur taluka)
अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या.
त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कार गाडीमधून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.
पिंपरखेडपासून शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले.
या घटनेनंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
या परीसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक वित्तीय संस्था व बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
web titel : Bank robbery news | Bank of Maharashtra Pimparkhed branch in Shirur taluka was looted by robbers at gunpoint , property worth Rs 2 crore 31 lakh looted