vishal fate scam | वाचा विशाल फटेचे धडकी भरवणारे धक्कादायक कारनामे, गुंतवणूकदारांची उडालीय झोप, तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला लागल्या रांगा !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । बार्शी,सोलापूर । Vishal Fate Scam । महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून एका स्कॅमने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या स्कॅमचे मुख्य केंद्र सोलापूर (solapur) जिल्ह्यातील बार्शी तालुका (Barshi) ठरला आहे. बार्शीच्या विशाल फटे (barshi vishal fate scam) या ठगाने आर्थिक गुंतवणूकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 200 कोटींचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. कोट्यावधी रूपयांची फसवणुक करणाऱ्या विशाल फटे याच्या कारनाम्यांची समोर येत असलेली माहित अचंबित करणारी आहे.
अनेकांना कोट्यावधी रूपयांचा चुना लावलेला विशाल हा फक्त बीए आहे. विषेश म्हणजे ही पदवी त्याने यशवंतराव मुक्त विद्यापीठातून घेतली आहे. 11 वीचे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला. परंतु, 11 वी मध्ये तो नापास झाला. त्यामुळे 12 वीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बार्शीला आणले. बार्शीत तो 12 वीत कसा तरी पास झाला. परंतु, आपण आयटी इंजिनीयर असून एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतल्याचे तो सांगत असे. विशालचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यामुळे तो अनेकांना हुशार वाटायचा. लोक त्याच्या बोलण्यावरूनच त्याच्यावर विश्वास ठेवायचे.(Vishal Fate Scam)
Vishal Fate Scam : 10 लाखात 6 कोटी परताव्याची योजना
विशाल फटे (Vishal Fate Scam) हा गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून अमिष दाखवत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. ‘एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे.
या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील’ अशी ऑफर दिल्यानंतर अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. 6 कोटी घेण्यासाठी बार्शीत अनेकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक केली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.(Vishal Fate Scam)
उच्चपदस्थांसोबतच्या फोटोंची गुंतवणूकदारांवर मोहिनी
विशाल फटे याचे उच्च पदस्थ अधिकारी, राजकारणी यांच्या सोबतचे फोटो लोकांना दाखवयचा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एका वाहिनीने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाल्याचे लोकांना सांगताच अनेकांचा त्याच्यावरील विश्वास वाढला. सत्कारासाठी ऑफिसमध्ये रांगा, सोशल मीडियावर फोटो फिरु लागले होते. यामुळे केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे विशालकडे गुंतवले. परंतु, हे सगळे खोटे असल्याचे समजल्यानंतर आपण फक्त फोटो पाहून लाखोंना बुडाल्याची भावना लोक आता व्यक्त करत आहेत.(Vishal Fate Scam)
केंद्रीय मंत्र्यांचे हस्ते विशालला पुरस्कार
फक्त बीए पास झालेला विशाल फटे हा अलका शेअर सर्व्हिसेसचा संस्थापक असून फोग्स ट्रेडिंग कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. याबरोबरच NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा. त्याने 2019 पासून अनेकांकडून गुंतणूक करून घेतली. यातील अनेकांना त्याने 28 टक्के परतावाही दिला. धक्कादायक बाब म्हणजे 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विशालला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. (Vishal Fate Scam)
मित्रांच्या बँक खात्यात यायचे गुंतवणूकदारांचे पैसे
विशालने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणी प्रथम फिर्याद दिलेले दीपक आंबरे यांनी दिली. (Vishal Fate Scam)
नेट कॅफेतून विशाल बनला हर्षद मेहता
विशाल बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयासमोर नेट कॅफे चालवत होता. नेट कॅफे चालवत असतानाच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. परंतु, आपण मागील 10 ते 15 वर्षांपासून शेअर मार्केट करत असल्याचे लोकांना सांगत होता. विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. सध्या बार्शीतील अलीपूर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता. (Vishal Fate Scam)
तीन महिन्यात दामदुप्पट
विशाल हा तीन महिन्यात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असे. प्रथम त्याने लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले. आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवून कोट्यावधी रुपये फटे याच्याकडे गुंतवणुकिसाठी दिले होते.(Vishal Fate Scam)
पैसे मोजण्यात तो वेळ घालवत नव्हता
विशाल फटे हा शालेय जीवनापासूनच फसवाफसवीचे धंदे करायचा, पुण्यात शिक्षणासाठी असताना त्याने आई म्हणून चक्क खानावळीतील महिलेला महविद्यालयात घेऊन गेला होता अशीही माहिती आता तपासात पुढे येत आहे.विशाल फटे ज्या योजनेद्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक करून घ्यायचा त्यासाठी त्याने राज्यात कमीशन एजंट नेमले होते. जे लोक गुंतवणूक करण्यास इच्छूक असायचे ते जेव्हा विशाल फटे कडे रक्कम द्यायचे ती रक्कम मोजण्यात वेळ न घालता तो कपाटात ठेऊन द्यायचा असे आता अनेक जण उघडपणे बोलत आहेत. (Vishal Fate Scam)
कार पाहायला लोक गर्दी करायचे
विशाल फटे याने 41 लाखाची कार खरेदी केली होती. त्या कारची क्रेझ इतकी होती की लोकं ती कार पाहायला आवर्जून विशालच्या शेतात यायची. परंतू विशालच्या फसवणूकीचा करारनामा चव्हाट्यावर आल्यानंतर एका गुंतवणूकदाराने तेथून ही कार नेल्याची चर्चा आहे.तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्याच्या ऑफिसमधील कॉम्प्यूटर, इतर सामान लंपास केले आहे, तर घर फोडून घरातील पंखे, एसी यासह अन्य चीजवस्तूही पळवल्या आहेत अशीही चर्चा आता रंगली आहे. (Vishal Fate Scam)
माणूस भेटला की जाळ्यात अडकलाच
अनेकांनी स्वतःचे घर, दागिने गहाण ठेवून, व्याजाने पैसे काढून मोठी रक्कम फटेकडे गुंतवणूक केली आहे. फसवणुकीमुळे अनेकांना धक्का बसला आहे, तर काहींजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. किमान दोनशे ते पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेचे हे फसवणूक प्रकरण असल्याची चर्चा आहे. एखादा माणूस विशालला भेटला की तो फसलाच, असे त्याचे वागणे असायचे, त्याच स्वभावातून त्याने आर्थिक फसवणूकीचे साम्राज्य उभारले होते. (Vishal Fate Scam)
फसवणुकीची व्याप्ती निपाणीपर्यंत
विशालने पुण्यातील खराडीमध्ये कार्यालय उघडले होते. तेथूनच तो आपले साम्राज्य चालवायचा. विशाल फटे स्कॅमची व्याप्ती चाळीसगाव, कोल्हापूर, कर्नाटकमधील निपाणी पर्यंत आहे. त्याने ज्या ज्या लोकांना गंडवले आहे त्या लोकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.
विशालच्या महाविशाल घोटाळ्यासंदर्भात आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूकीचा आकडा तब्बल 18 कोटींवर पोहोचला आहे.विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे. तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. (Vishal Fate Scam)
… म्हणून तो परदेशात जाऊ शकत नाही
विशाल फटे याच्याकडे फक्त स्वतःचा पासपोर्ट असून पत्नी व मुलीचा नाही, त्यामुळे तो परदेशात पळून जाऊ शकत नाही. जेथे पासपोर्टची गरज नाही, अशा शेजारच्या देशात जाऊन तो लपू शकतो. पण आम्ही लवकरच त्याला ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलिसांकडून दिला जात आहे.
फरार विशाल फटे याचा बेड्या कधी
तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची माया विशालने जमा केली. परंतु, हाच विशाल आता 9 जानेवारीपासून फरार आहे. त्यामुळे आधी श्रीमंत होण्याची स्वप्न दाखणाऱ्या विशालने फरार होत अनेकांची झोप उडवली आहे. विशाल फटे स्कॅमप्रकरणात पोलिसांनी विशालच्या वडिलांसह भावाला अटक केली आहे. विशाल फटे स्कॅम प्रकरणावर SIT ची स्थापन करण्यात आली आहे. विशाल फटेला तातडीने बेड्या ठोकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे मोठे अव्हान आता प्रशासना समोर उभे ठाकले आहे.