Siddheshwar Mahayatra | सिध्देश्वराची भाकणूक : वासराने शिवलेल्या वस्तू महागणार, राजकीय स्थैर्य? यंदाचा पाऊस कसा ? वाचा सविस्तर!
सोलापुर, 16 जानेवारी । Bhakanuk program Siddheshwar Mahayatra Solapur | सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या यात्रेत ‘भाकणूक’ प्रथेला मोठं महत्व आहे.स्थिर वातावरणाबरोबर लाल व पांढर्या वस्तू महागणार व मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार, असे भाकीत सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी वर्तवले आहे.
दरवर्षीप्रमाणे सोलापुरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेत (Siddheshwar Mahayatra Solapur ) वासरांकडून भाकणूक केली जाते. फडकुले सभागृह येथे भाकणुकीचा कार्यक्रम ( Bhakanuk program ) झाला. होमप्रदीपन सोहळा झाल्यानंतर वासराची भाकणूक कार्यक्रम संपन्न होतो. सिद्धेश्वर महायात्रेत भाकणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही नागरिक या भाकणुकीच्या बाबींवर विश्वास ठेवतात.
भाकणूकच्या ठिकाणी वासरू आणण्यात आले . त्याला पाणी लावून पूजा करण्यात आली. त्याच्यासमोर तांदूळ, बोर, गाजर, ऊस, पान, खारीक आदी वस्तू ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पाहणी केल्यानंतर वासराने ऊस, गाजर आणि गुळ खाल्ले. त्यामुळे लाल व पांढरे वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन ते महागणार असल्याचे मानकरी हिरेहब्बू यांनी सांगितले. तसेच यंदाही देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, सामाजिक राजकीय शांतता असेल असेही त्यांनी सांगितले.
वासराने भाकणूकीच्या ठिकाणी मलमूत्र केले. त्यावरून अशी भाकणूक करण्यात आली की, यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडणार. तसेच स्थिर थांबल्याने यंदाच्यावर्षी वातावरण स्थिर राहील असे हिरेहब्बू यांनी भाकणूक केली.
सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगा जवळ सती गेलेल्या कुंभार कन्येची महापूजा करण्यात आली. प्रतिकात्मक म्हणून दगडाची पूजा करण्यात आली. कुंभार कन्येला लागणारे संसार पयोगी साहित्य एका मोठ्या टोपली मध्ये ठेवण्यात आले. त्यांनतर त्या टोपलीची पूजा मानकरी सागर हिरेहब्बू व सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ती टोपली शिवशंकर कंतीकर यांनी डोक्यावर ठेवून तलावात सोडले.