National Highways | मुहूर्त ठरला ! नितीन गडकरींच्या हस्ते कर्जत – जामखेड मतदारसंघातील 02 राष्ट्रीय महामार्गांचे होणार भूमीपूजन !

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला आले यश 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : National Highways | अहमदनगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला असुन राष्ट्रीय महामार्ग क्रं.५१६-अ अहमदनगर-करमाळा व राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४८-ड श्रीगोंदा-जामखेड या महामार्गाचे ०२  ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कामासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता. (Bhumi Pujan of 02 National Highways in Karjat-Jamkhed constituency to be held by Nitin Gadkari)

भु-संपादनाचा रेंगाळत पडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला मिळवून दिला.या मार्गात काही अंतरावरील रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत होता त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आ.पवारांनी नागपूर येथील कार्यालयाच्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांशी वैयक्तिक लक्ष घालुन अडचणींचा मार्ग मोकळा केला.

दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या तीन वेळा भेटी घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यामध्ये लक्ष घालून विनंती केल्यानुसार या महामार्गातील श्रीगोंदा-जामखेड व अहमदनगर-करमाळा या रस्त्यांना मंजूरी मिळाली.

राष्ट्रीय महामार्गांमुळे नगर ते सोलापूर पर्यंत असलेल्या अनेक तालुक्यांना समृद्धी प्राप्त होणार आहे.अनेक उद्योग व्यवसाय, बाजारपेठा व अर्थकारणाची गंगा वाहणार आहे.

 

web titel : National Highways | Bhumi Pujan of 02 National Highways in Karjat-Jamkhed constituency to be held by Nitin Gadkari