रत्नदीपच्या वर्धापन दिनानिमित्त डाॅ भास्कर मोरे पाटलांचा मोठा निर्णय, विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचार्यांना दिले मोठे गिफ्ट
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत-जामखेड मतदारसंघातील आरोग्य क्षेत्रात काम करत असलेल्या रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या 22 व्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर ही संस्था गेल्या 22 वर्षांपासून जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथे कार्यरत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात या संस्थेचा कार्यविस्तार आहे. ही संस्था आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेकडून रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस, नर्सिंग व फार्मसी या अभ्यासक्रमाचे महाविद्यालये चालविला जातात. या संस्थेत महाराष्ट्रातील 1200 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नदीपच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय संस्थेने घेतला आहे. या विमा संरक्षणात वीस हजारांपर्यंत आरोग्य विषयक उपचार मोफत मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सचिव डाॅ वर्षा मोरे पाटील यांनी दिली. यावर प्रशांत राळेभात, विकास लाळगे, विनोद निंबाळकर, विजय गिरमकर सह आदी उपस्थित होते.
रत्नदिपचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ. वर्षा मोरे पाटील हे गेल्या 22 वर्षांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर ही संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमांतून जामखेड-कर्जत तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम ते राबवत आले आहेत. मोरे दांम्पत्याने मोठ्या कष्टातून 20 एकर जागेत वैद्यकीय शिक्षण देणारे पहिले शैक्षणिक संकुल जामखेड तालुक्यात उभारले आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी शैक्षणिक संस्था म्हणून रत्नदीपचा नावलौकिक आहे.
रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये व मौल्यवान’ भेटवस्तू देऊन संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली होती. आता संस्थेचा वर्धापन दिन आणि संस्थेच्या सचिव डाॅ वर्षा मोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.
रत्नदीप शैक्षणिक संकुलातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकी रूपये एक लाख रक्कमेचा विमा उतरविण्याचा संस्थेने घेतलेला निर्णय उत्साहवर्धक व भावनिक आहे, या निर्णयाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचे मनापासून आभार, अशी भावना रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शरीर रचना विभागाच्या प्राध्यापिका डॉ झेबिया गफ्फार शेख यांनी व्यक्त केली.