ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 17 पैकी 13 रूग्ण आयसीयूत उपचार घेत होते, तर 4 रूग्ण जनरल वार्ड मध्ये उपचार घेत होते. यापुर्वी 10 ऑगस्ट 2023 रोजी एकाच रात्री पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री 17 जणांचा मृत्यू झाला. रात्री साडे दहा ते सकाळी साडेआठ या वेळेत 17 जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे काय?
खाजगी रुग्णालयातून काही रूग्ण शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रूग्ण हे वयोवृद्ध असल्यामुळे दगावल्याचे रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
सिव्हिल रूग्णालय बंद अन्
ठाणे सिव्हिल रूग्णालय बंद झाल्यापासून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. जास्त रूग्ण संख्येचा ताण या रूग्णालयावर येऊन रुग्णसेवा नेहमीच कोलमडून जाते. अपुरी डाॅक्टर क्षमता, अनागोंदी कारभार यामुळे या रूग्णालयांची वैद्यकीय सेवा कोलमडून गेल्याचे वारंवार घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.