जामखेड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’ काही : जामखेडकर म्हणतात क्या बात है

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कुठल्याही शासकीय विभागाच्या प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त त्या विभागाचे कर्मचारी बहूतेकदा औपचारिक केक कापून वाढदिवस साजरा करतात हे आपण नेहमी पाहत आलो आहोत. तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, सत्कार करणे, केक कापणे, सोशल मिडीयावर शुभेच्छा देणे असे नेहमीचे उपक्रम बहुतेकदा वाढदिवस साजरा करताना केले जातात.

पण एखाद्या अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रमाची जोड देऊन तो साजरा करणे तसे दुर्मिळच असाच विधायक उपक्रम जामखेड पंचायत समितीच्या इतिहासात(Jamkhed Panchayat Samiti) पहिल्यांदाच शनिवारी घडला. निमित्त होते जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसाचे.त्यानिमित्त जामखेड तालुक्यात तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबीरांचे (blood donation camp) आयोजन करण्यात आले होते.

वास्तविक पाहता बीडीओ प्रकाश पोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. तशी त्यांची राज्यात ओळख आहे. सृजनशील उपक्रमांच्या माध्यमांतून ते आजवर आपल्या कामाचा ठसा उमटवत आले आहेत. तसाच ठसा ते आता जामखेड पंचायत समितीत उमटवण्यासाठी काम करताना दिसत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून पंचायत समितीत वाचनालय सुरू होणार आहे.

Big response to the blood donation camp organized on the occasion of the birthday of Group Development Officer Prakash Pol

जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday of Group Development Officer Prakash Pol) शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी जामखेड पंचायत समिती, ल. ना. होशिंग विद्यालय व खर्डा शहर या तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराचे आयोजन पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक यांनी केले होते. एक चांगला सामाजिक उपक्रम राबवून पंचायत समितीने नवा आदर्श प्रस्थापित केला.

Big response to the blood donation camp organized on the occasion of the birthday of Group Development Officer Prakash Pol

शनिवारी सकाळी जामखेड पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. दिवसभरात पंचायत समिती 58 , ल. ना. होशिंग विद्यालय -42 आणि खर्डा येथे 51अशा 151 व्यक्तींनी रक्तदान केले. यावेळी जामखेड तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.अधिकारी कर्मचारी, शिक्षक  तरूण वर्ग व नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.अनेकांनी पोळ यांना वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट दिली.

Big response to the blood donation camp organized on the occasion of the birthday of Group Development Officer Prakash Pol

जामखेड पोलिस स्टेशनच्या उपक्रमाची झाली आठवण ताजी

काही दिवसांपुर्वी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीनेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरातही मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन झाले होते. पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी व शिक्षकांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून जामखेड पोलिस स्टेशनच्या उपक्रमाची आठवण ताजी केली.

विधायक कार्यात सरकारी कार्यालयांचा सक्रीय सहभाग कौतुकास्पद

शासकीय कार्यालयांचे प्रमुख जर समाजहितदक्ष असतील तर त्यांच्या पुढाकारातून नेहमी विधायक कामांना बळ दिले जाते.शाश्वत समाजकार्याचा आदर्श निर्माण केला जातो.जामखेडमधील प्रशासकीय कार्यालयांकडून विधायक कार्यात दाखवला जात असलेला सक्रीय सहभाग कौतुकाचा विषय ठरू लागला आहे. विधायक उपक्रमांमधून जामखेडची नवी ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे. जामखेड तालुक्यात सामाजिक सेवाकार्याचे वातावरण निर्मितीसाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसलेली कंबर कौतुकास्पद आहे. सामाजिक सेवेचे वातावरण तयार केले जात असतानाच तालुक्यातील काही ‘तथाकथित चमकोंना’ पाठबळ न देण्याचीही भूमिका प्रशासनातील धुरिणांना घ्यावी लागेल. तेव्हाच तालुक्यात विधायक सेवाकार्याचे पोषक वातावरण वाढेल.