जामखेडच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज : अखेर ठरलं ! सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी घेतला मोठा राजकीय निर्णय !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ हे जामखेड बाजार समिती निवडणुकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सोनेगाव येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रा सचिन गायवळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बाजार समिती निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. बाजार समिती निवडणुकीत दोन प्राध्यापक एकत्र येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ हे भाजपसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यांनी दोन दिवसांपुर्वी माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे फोटो माध्यमांतून तसेच सोशल मिडीयातून व्हायरल झाले होते. यावेळी गायवळ यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रा सचिन गायवळ यांच्या समर्थकांची आज संध्याकाळी सोनेगाव येथे बैठक पार पडली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत तालुक्यातील गायवळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड बाजार समिती निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांनी आपल्या समर्थकांची आज सायंकाळी बैठक बोलावली होती, या बैठकीस अनेक गावांचे सरपंच, सदस्य, चेअरमन, संचालक उपस्थित होते. यावेळी बैठकीत बोलताना प्रा सचिन गायवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गायवळ यांनी दोन दिवसांपुर्वी आमदार प्रा.राम शिंदे यांची का भेट घेतली? याबाबत सविस्तर भूमिका मांडली. तसेच बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी सहमती दर्शवली. गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्याला ज्या निर्णयाची उत्सुकता होती. अखेर ती उत्सुकता संपली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांची राजकीय ताकद आता आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठिशी एकवटल्याने जामखेड तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
जामखेडच्या राजकारणात प्रा सचिन गायवळ यांची मोठी राजकीय ताकद आहे. गायवळ यांनी सामाजिक कामांच्या माध्यमांतून जामखेडच्या राजकारणात स्वता:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. सर्वच पक्षात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खर्डा गटात गायवळ यांची राजकीय ताकद मोठी आहे.याशिवाय जामखेड तालुक्यातही त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. प्रत्येक गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत: युवा वर्गात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. विविध गावांचे सरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, संचालक हे गायवळ यांच्या पाठीशी एकवटलेले आहेत. बाजार समिती निवडणुकीत प्रा सचिन गायवळ आणि त्यांच्या समर्थकांनी आमदार प्रा राम शिंदे अर्थात भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणून गेले आहेत.