sugarcane crushing season 2021-22 | हळगावच्या जय श्रीराम साखर कारखान्याचा बाॅयलर पेटला : यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी कारखाना झाला सज्ज !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : sugarcane crushing season 2021-22 | जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्याच्या 11व्या गळीत हंगामाचा बाॅयलर रविवारी पेटवण्यात आला.जय श्रीराम शुगर्स कारखाना यंदाच्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे.येत्या 21 तारखेपासुन प्रत्यक्ष गळीत हंगामास प्रारंभ होणार आहे. (Boiler of Jay Shriram Sugar Factory ignited: Halgaon Jay Shriram Sugar factory is ready for sugarcane crushing season 2021-22)

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर या साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळ्याचे रविवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते. कारखान्याच्या उत्पादन विभागातील शरद इंगोले व त्यांच्या पत्नी प्रिया इंगोले या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पुजा करण्यात आली.

जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते जय श्रीराम साखर कारखान्याच्या 11 व्या गळीत हंगामाचे बाॅयलर अग्नीप्रदीपन पार पडले.

sugarcane crushing season 2021-22

तीन लाख पाच हजार मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर के एन निबे

यावेळी बोलताना एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर के एन निबे म्हणाले की, यंदा कारखान्याने तीन लाख पाच हजार मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सन 2021 – 22 हंगामासाठी 5071 हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे.  तालुक्यात ऊसाचे एकही टिपरू शिल्लक राहणार नाही. शेतकर्यांनी गाळपासाठी घाई करू नये. यंदा कारखाना दोन हजार दोनशे रुपये भाव देणार आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी 123 ट्रॅक्टर व 29 डंपिंग असे एकुण 152 वाहनांचे करार करण्यात आले आहे. साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना मिळाला आहे.

निबे साहेबांसारखे उत्कृष्ट नेतृत्व श्रीराम कारखान्याला लाभले – पठाण

यावेळी बोलताना माजी कार्यकारी संचालक एच ए पठाण साहेब म्हणाले की, निबे साहेबांमुळे कारखाना भरभराटीला आला आहे.आगामी काळातही शेतकरी हितासाठी चांगले निर्णय घेतले जातील. कर्जत- जामखेड मतदार संघातील हळगाव मधील शेतकरी पहिल्या पासुन कष्टाळू आहे. माझा 45 वर्षाचा साखर कारखानादारीचा अनुभव आहे. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असेल तर कारखाना भरभराटीस येतो. निबे साहेबांसारखे उत्कृष्ट नेतृत्व श्रीराम कारखान्याला लाभल्यामुळे श्रीराम कारखाना भविष्यात खुप मोठी झेप घेईल हा विश्वास आहे. खुर्ची आहे तर सलाम आहे. परंतु माझ्या सारख्या रिटायर माणसाला बोलावलं आणि माझा सन्मान केला. हे काम फक्त निबे साहेबच करू शकतात. हळगावचा श्रीराम कारखाना कामगार, शेतकरी, तसेच इतर घटकांच्या हिताचे निर्णय सतत घेत असल्याने कारखान्याची मोठी भरभराट होणार आहे विश्वास पठाण यांनी व्यक्त केला.

sugarcane crushing season 2021-22

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक के एन निबे, माजी कार्यकारी संचालक एच ए पठाण, कारखान्याचे जनरल मॅनेजर निंबाळकर,अदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किसनराव ढवळे, सरपंच अनिता ढवळे,चिफ इंजिनिअर श्रीहरी साखरे, चिफ केमिस्ट नवनाथ चौधरी, चिफ अर्कोटंट सोमनाथ शिंदे, मुख्य शेती अधिकारी मधुकर मोहिते, गुप्तवार्ता विभागाचे पोलीस नाईक अविनाश ढेरे, जामखेडचे साखर व्यापारी जैन काका व विजय कोठारी माजी सरपंच राजेंद्र ढवळे, राजुभैय्या सय्यद, हसनभाई शेख, मदन लेकुरवाळे आणि सर्व अधिकारी, उपखातेप्रमुख , विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थीत होते. कारखान्याचे जनरल मैनेजर विलास निंबाळकर यांनी  कामगारांचे आभार मानले.

 

web title : Boiler of Jay Shriram Sugar Factory ignited: Halgaon Jay Shriram Sugar factory is ready for sugarcane crushing season 2021-22