Bopdev Ghat gang rape News : खळबळजनक, मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक अत्याचार, गैंगरेपच्या घटनेने पुण्यात खळबळ, बोपदेव घाटात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Bopdev Ghat gang rape News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासमवेत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगुन एका टोळक्याने २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या मित्राला बांधुन ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघा अज्ञात नराधमांविरोधात कोंढवा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bopdev Ghat News, 21-year-old girl who went for walk with friend was gang-raped, the incident of gang-rape created excitement in Pune, what exactly happened at Bopdev Ghat? Read in detail

बोपदेव घाटात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली पिडीत तरूणी ही सुरत येथील रहिवासी आहे. तर तिचा मित्र जळगावचा रहिवासी आहे. दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहोत. दोन दिवसांपुर्वी हे दोघे पुण्यातील बोपदेव घाटामध्ये रात्री अकरा वाजता दुचाकीवरून फिरायला गेले होती. रात्री बाराच्या सुमारास बोपदेव घाटात तिघा नराधमांना हे दोघे दिसले. त्यावेळी तिघांनी पिडीत तरूणीच्या मित्राला मारहाण केली. त्याला शर्ट व बेल्टने बांधून डांबून ठेवले. त्यानंतर तिघा नराधमांनी त्या तरुणीवर सामुहिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिघे आरोपी फरार झाले. (Bopdev Ghat gang rape News)

दरम्यान, या घटनेमुळे भेदरलेल्या पिडीतेच्या मित्राने तश्या अवस्थेत पिडीत तरूणीला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर सामूहिकपणे गैंगरेप झाल्याचे उघडकीस आले. सध्या पिडीत तरूणीची प्रकृती स्थिर आहे. कोंढवा पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे दहा पथके तसेच डीबी पथक या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेत आहे.(Bopdev Ghat gang rape News)

Bopdev Ghat News, 21-year-old girl who went for walk with friend was gang-raped, the incident of gang-rape created excitement in Pune, what exactly happened at Bopdev Ghat? Read in detail

बोपदेव घाटात बोपदेव पोलिस चौकी आहे. त्याच्या पाठीमागेच हा सामुहिक गैगरेपचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बीट मार्शल आणि पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या घाटात वारंवार लुटमारीच्या घटना होत असताना देखील कोंढवा पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता होत आहे. पोलीस मदत केंद्र केलं आहे. तिथं प्रत्येकवेळी लोक नसतात. मात्र पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. (Bopdev Ghat gang rape News)

Bopdev Ghat gang rape News

पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, काल (गुरूवारी) रात्री 21 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री 11च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण 10 पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. (Bopdev Ghat gang rape News)

मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी 21 वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे. (Bopdev Ghat gang rape News)