Breaking News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळवर प्राणघातक हल्ला, गजबजलेल्या कोथरूड भागात गोळीबार !

पुणे । जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 5 जामखेड 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याच्यावर कोथरूडच्या सुतारदरा भागात प्राणघातक हल्ला झाला आहे.अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहळ याच्यावर गोळीबार केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. कुख्यात गुंडावर भरदिवसा गोळीबार झाल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ही घटना गँगवाॅरमधून घडली असावी असा संशय व्यक्त केला आहे.

Breaking News, Deadly attack on Pune's notorious gangster Sharad Mohal, gunfire erupted in crowded Kothrud area in pune

पुण्यातील कोथरुड परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी अज्ञात हल्लोखोरांनी शरद मोहोळ यांच्यावर एकामागे एक तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली. त्यानंतर लागलीच शरद मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे.

कोण आहे शरद मोहळ ?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.