Breaking News : अहमदनगरमध्ये मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, घटनास्थळाहून गावठी कट्ट्यासह तलवार सापडल्याने उडाली खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Dheeraj Joshi Ahmednagar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेकांचा बळी गेला आहे. गेल्या आठ दहा दिवसांत राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू झाल्या की काय? असा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.राजकीय नेत्यांवरील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अहमदनगर शहरातील एका मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील किर्लोस्कर काॅलनी (गुलमोहर रोड) या भागातील बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज जोशी (Bansi Maharaj Mithaiwale, Dheeraj Joshi) यांच्यावर आज 10 रोजी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज जोशी (Bansi Maharaj Mithaiwale Dheeraj Joshi) यांच्यावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळाहून गावठी कट्टा व तलवार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धीरज जोशी यांच्यावर कोणत्या कारणांवरून प्राणघातक हल्ला करण्यात आला? याचा पोलिसांकडून वेगाने शोध घेतला जात आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगाने तपास करत आहे.
पुणे : दुकान मालकावर गोळीबार करत सराफ व्यावसायिकाने केली आत्महत्या
पुणे शहरातून गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैश्याच्या वादातून सराफ व्यावसायिकाने दुकान मालकावर गोळीबार केला. गोळीबारानंतर सराफ व्यावसायिकाने स्वता:वर गोळी झाडत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पुण्यातील औंध – बाणेर भागातील ज्यूपीटर हाॅस्पीटल भागात घडली. भर चौकात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत अनिल ज्वेलर्सचे संचालक तथा सराफ व्यावसायिक अनिल ढमाले – Anil Dhamale pune (वय 52) यांचा मृत्यू झाला आहे, तर दुकान मालक गजानन जाधव- Gajanan Jadhav pune (वय 42) हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिल ढमाले यांनी जाधव यांच्यावर गोळीबार केल्यानंतर ते पोलिसांत हजर होण्यासाठी रिक्षाने जात होते. औंधच्या भाले चौकात रिक्षा थांबवून त्यांनी रिक्षा चालकास पाणी आणण्यास पाठवले. त्यानंतर रिक्षात स्वता:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना ढमालेकडे सुसाईड नोट मिळाली. त्यात लिहिले होते की, मागील काही महिन्यांपासून जाधव त्याला त्रास देत होते. याला कंटाळून जीवन संपवण्याचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ढमाले याच्याकडे पिस्तुल होते व त्याचा परवानाही होता. त्यात पिस्तुलमधून त्याने गोळीबार करुन स्वत:ही आत्महत्या केली आहे.