ब्रेकिंग न्यूज : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात | Tanaji Sawant car accident Kolhapur News
कोल्हापुर : Tanaji Sawant car accident Kolhapur News : कोल्हापुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या घटनेत मंत्री सावंत हे थोडक्यात बचावले आहेत. तर त्यांचा स्विय सहाय्यक हे या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्री तानाजी सावंत हे आज कोल्हापूर दौर्यावर होते. कोल्हापूरहून ज्योतिबा जात असताना सावंत यांच्या गाडीला आज दुपारी भीषण अपघात झाला. मंत्री सावंत यांच्या ताफ्यातील कारचा पन्हाळा मार्गावरील रजपुतवाडी भागात अपघात झाला. या अपघातात मंत्री सावंत यांच्या ताफ्यातील एका गाडीने सावंत यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिली. तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली.अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला. मंत्री तानाजी सावंत हे सुखरूप आहेत. या अपघातात मंत्री सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांचे स्वीय सहायक रावीराज जाधव हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर मंत्री सावंत दुसऱ्या शासकीय वाहनाने जोतिबा डोंगर येथे दर्शनासाठी रवाना झाले.
मंत्री सावंत हे रविवारी सकाळी गारगोटी येथील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम उरकून त्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते जोतिबाच्या दर्शनाला जात असताना कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी नजीक सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाने मंत्री सावंत यांच्या वाहनास पाठीमागून धडक दिली. या अपघातात मंत्री तानाजी सावंत सुखरूप असून, स्वीय सहायक रविराज जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. सावंत यांच्या ताफ्यातील वैद्यकीय पथकाने तातडीने जाधव यांच्यावर उपचार केले. गाडीचेही नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर मंत्री सावंत हे दुसऱ्या शासकीय वाहनाने तातडीने जोतिबाच्या रवाना झाले. दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.