ब्रेकिंग न्यूज: अखेर रत्नदीपच्या विद्यार्थ्यांचे 11 व्या दिवशी अंदोलन स्थगित, आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पांडुरंग भोसले यांनी सोडले उपोषण, Nilesh Lanke Latest News Today
सत्तार शेख । जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Bhaskar More latest News Today : रत्नदिप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले अंदोलन अखेर 11 व्या दिवशी स्थगित करण्यात आले.आमदार निलेश लंके यांनी 11 व्या दिवशी अंदोलनस्थळी भेट दिली.त्यांनी अंदोलकांशी सविस्तर संवाद साधला.त्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस अश्वासन दिले.शुक्रवारी सायंकाळी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नारळपाणी घेत शिवप्रतिष्ठानच्या पांडुरंग भोसले (Panduraje Bhosale Jamkhed) यांनी उपोषण सोडले गेल्या 11 दिवसांपासून सुरु असलेले विद्यार्थ्यांचे अंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी जाहीर केले. (Nilesh Lanke Latest News Today)
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या (Ratnadeep Medical Foundation and Research Centre jamkhed) रत्नदीप शैक्षणिक संकुलात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यातील मंगळवारपासून रत्नदीप शैक्षणिक संकुलातील गैरकारभार आणि संस्थापक डाॅ भास्कर मोरे (Dr Bhaskar More Jamkhed) यांच्याकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि छळवणूकीविरोधात दंड थोपटत आक्रमक अंदोलन हाती घेतले होते.आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde MLA) यांनी दोन दिवसांपुर्वी अंदोलकांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित खात्यांचे मंत्र्यांनी जामखेडमध्ये विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या आक्रमक अंदोलनाची दखल घेतली. आमदार राम शिंदे यांच्या मागणीनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शासनाने रत्नदीप प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी 15 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.
डाॅ भास्कर मोरेंच्या अत्याचारी कारभाराने पीडित शेकडो विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले अंदोलन राज्यात गेल्या 10 दिवसांपासून गाजत आहे. रत्नदीपच्या विद्यार्थीनींनी आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूकीचे गंभीर आरोप केले. त्याबरोबर एका विद्यार्थीनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने रत्नदीपचा संस्थापक डाॅ भास्कर मोरे हा चांगलाच अडचणीत सापडला. यात भर पडली ती हरण पाळण्याच्या छंदाची. हरीण पाळल्या प्रकरणीही भास्कर मोरेंविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे विद्यार्थांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या भास्कर मोरेला जोवर अटक होत नाही तोवर अंदोलन सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे हे अंदोलन राज्यात चर्चेत आले होते.
अखेर अंदोलनाच्या 9व्या दिवशी रात्री उशिरा अहमदनगर एलसीबीच्या पथकाने भास्कर मोरेला भिगवन येथील एका उसाच्या शेतातून अटक केली. त्यानंतर त्याला जामखेड न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अंदोलनाच्या अकराव्या दिवशी भास्कर मोरे याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वनविभागाच्या गुन्ह्यात मोरे याला ताब्यात देण्यात आले आहे. वनविभाग पुढे काय कारवाई करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, भास्कर मोरेंविरोधात आक्रमकपणे अंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या रत्नदीपच्या विद्यार्थ्यांना जामखेडमधील विविध सामाजिक व राजकीय संघटनांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठी साथ लाभली. विशेषता: शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले (Pandurang Bhosale Jamkhed) यांनी विद्यार्थ्यांच्या अंदोलनात सहभागी होत आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेतले होते.अंदोलनाच्या 11 व्या दिवशी हे अंदोलन स्थगित करण्यात आले.आमदार निलेश लंके यांच्या हस्ते नारळ पाणी घेत पांडुरंग भोसले यांनी उपोषणाचे अंदोलन तात्पुरते स्थगित केले. (Nilesh Lanke News)
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या सर्व कॉलेजच्या मान्यता रद्द करणे, सर्व विद्यापीठाचे नोडल अधिकारी नियुक्त करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येतील, असे अश्वासन प्रशासना मार्फत मिळाल्यानंतर गेल्या 11 दिवसांपासून जामखेडमध्ये सुरु असलेले रत्नदीपमधील विद्यार्थ्यांचे अंदोलन स्थगित करण्यात आले. (Ratnadeep Vidyarthi Aandolan latest updates)
भास्कर मोरे न्यायालयीन कोठडीत
रत्नदीप मेडिकल फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कोठडी आज संपली. न्यायालयाने मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. हरिण पाळल्याप्रकरणी भास्कर मोरेंविरोधात वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वनविभागाने मोरे याला ताब्यात घेतले आहे. (Bhaskar More latest news today)
नागपुरचा अहवाल भास्कर मोरेंच्या अडचणी वाढवणारा ठरणार ?
वन विभागाला भास्कर मोरेच्या रत्नदीप कॉलेजच्या आवारात आणखी एका प्राण्याचे आवषेश सापडले आहेत. हे अवशेष हरणाचे आहेत की अन्य वन्यप्राण्याचे याचा तपास करण्यासाठी सापडलेले अवशेष नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या लॅबचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नागपुरच्या लॅबचा रिपोर्ट जर भास्कर मोरेच्या विरोधात गेला तर मग भास्कर मोरेच्या (Bhaskar more vanvibhag crime) अडचणीत मोठी वाढ होणार आहे. वन्यजीव कायद्याची मोठी खुटी भास्कर मोरेच्या कारकिर्दीला मोठे ग्रहण लावण्यास पुरेशी ठरेल अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. (Bhaskar More news today)
आमदार निलेश लंके काय म्हणाले ?
आमदार निलेश लंके म्हणाले की, या भागातील दोन्ही प्रशासन आणि शासनाकडे पाठपुरावा केलेलाच आहे. मी ही काही वेळातच विद्यापीठ प्रशासन, संबंधित मंत्री महोदय यांना माझे पत्र देत आहे. जर सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर झाल्या नाहीत तर पुढील अंदोलन नगर येथे करू त्या अंदोलनाची जबाबदारी माझी राहील. (Nilesh Lanke Latest News today)
विद्यार्थ्यांनी केलेल्या या अंदोलनास पाठींबा देण्यासाठी पांडुरंग भोसले यांनी अंदोलन केले व अंदोलनास यश आले. माझेही तसेच काम आहे. मीही हाती घेतलेले कोणतेही कार्य पुर्ण केल्याशिवाय राहात नाही. या अंदोलनास पाठींबा दिल्याबद्दल पांडुरंग भोसलेंसह विविध पक्षसंघटना व जामखेडमधील नागरिकांचे लंके यांनी आभार मानले. तसेच ज्या-ज्या वेळी तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही मदतीची गरज असेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी नाही तर दोन पावलं तुमच्या पुढे असेल, तसेच मंत्री महोदय किंवा विद्यापीठा समोर जरी अंदोलन करण्याची वेळ आली तरी मी तुमच्यासोबत असेल असेही आश्वासन आ. निलेश लंके यांनी यावेळी बोलताना दिले. (Nilesh Lanke jankhed news today)
आज शुक्रवार दि १५ रोजी आ. निलेश लंके यांनी जामखेडमधील अंदोलक विद्यार्थी आणि पांडुरंग भोसले यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रत्नदीप शैक्षणिक संकुलावर व डाॅ भास्कर मोरेंविरोधात कठोर कारवाई न झाल्यास मुलामलींसह पुढचे आंदोलन अहमदनगर येथे करण्यात येईल असा इशारा लंके यांनी दिला. (Nilesh Lanke news jamkhed)
यावेळी तहसीलदार गणेश माळी, पोलिस निरीक्षक महेश पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, आर पी आय जिल्हाअध्यक्ष सुनिल साळवे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, भाजपचे शहराध्यक्ष पवन राळेभात, रमेश आजबे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, शहाजी राळेभात, सनी सदाफुले, डॉ. भरत दारकुंडे, सचिन देशमुख, प्रशांत राळेभात, विजय राळेभात, भाऊ पोटफोडे, भाऊ म्हेत्रे, गणेश जोशी, आकाश घागरे, राजेंद्र गोरे प्रफुल सोळंकी, शुभम हजारे सह ग्रामस्थ उपस्थित होते. (Nilesh Lanke Latest News in marathi)