जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर धाड टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे आता बोलले जात आहे.
मिडीया रिपोर्टनुसार शुक्रवारी सकाळी बारामती येथे केंद्रीय तपास यंत्रणेने बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड टाकल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. या धाडीबाबत केंद्रीय तपास यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या कारवाईमुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
पिंपळी (ता. बारामती) येथील बारामती ऍग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. शुक्रवारी (दि.5) सकाळी कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्याचे समजते. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र या धाडीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही.
परंतू सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने बारामती ॲग्रोशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. बारामती, पुणे, छत्रपती संभाजीनगर सह अन्य ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मनी लाँड्रिंग संदर्भात ईडीकडून तपास सुरू आहे. ईडीने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे रोहित पवार मोठ्या अडचणीत सापडले आहेत.