लिंबूणीच्या शेतातील गांजाची शेती उध्वस्त; 09 लाख रूपयांचा गांजा जप्त, DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव (DYSP Annasaheb Jadhav) यांच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत सुमारे 09 लाख रूपये किमतीचे गांजाची झाडे हस्तगत करण्यात आले आहेत. (Cannabis worth Rs 09 lakh seized) श्रीगोंदा तालुक्यात (raid in Shrigonda) ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील एका लिंबूणीच्या शेतात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती DYSP आण्णासाहेब जाधव यांना प्राप्त झाली होती. सदर बातमीची खातरजमा झाल्यानंतर DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने श्रीगोंदा पोलिस पथकाला सोबत घेत श्रीगोंदा शिवारातील जगतापवस्ती येथील गट नंबर 700,701 या क्षेत्रात धाड टाकली.
या ठिकाणी असलेल्या लिंबूणीच्या शेतात गांजाची शेती केली जात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. घटनास्थळाहून पोलिसांनी गांजाची लहान मोठी झाडे ताब्यात घेतली.या गांजाची बाजारभावानुसार सुमारे 09 लाख रूपये किम्मत आहे. ही कारवाई 30 रोजी करण्यात आली. (Cannabis cultivation in lemon groves destroyed; Cannabis worth Rs 09 lakh seized, raid by DYSP Annasaheb Jadhav’s team)
बेकायदेशीररित्या गांजाची शेती केल्याप्रकरणी अरुण हरिभाऊ जगताप (वय56) व बाळू हरिभाऊ जगताप (वय 59) दोघे राहणार जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये श्रीगोंदा शिवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Arun Haribhau Jagtap (age 56) and Balu Haribhau Jagtap (age 59) were arrested)
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.
श्रीगोंदा : 09 लाखांची गांजाची झाडे जप्त, दोघांना अटक, कर्जतचे DYSP आण्णासाहेब जाधव यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई ! pic.twitter.com/oeQ8jhGY2g
— Jamkhed Times (@JamkhedTimes) October 30, 2021