परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपीविरुध्द राजद्रोहाचा गुन्हा करा – जामखेड तालुक्यातील भिमसैनिकांची मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : परभणी शहरात संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. जामखेड शहरातही परभणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.संतप्त शेकडो भिमसैनिकांनी परभणी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत सदर प्रकरणातील आरोपीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीकृतीची एका इसमाने विटंबना केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेचे परभणी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. याचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. जामखेड शहरात या घटनेचे १२ रोजी पडसाद उमटले. जामखेड तालुक्यातील शेकडो भिमसैनिकांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी परभणी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.या घटनेतील आरोपीविरुध्द राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भिमसैनिकांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड.अरुण जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद,सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमटोला ग्रुपचे बापुसाहेब गायकवाड, प्रा. विकी घायतडक सर, बापुसाहेब ओव्हळ, विशाल अब्दुले, प्रा.सुनिल जावळे, दादासाहेब घायतडक, रिपाईचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले, उपाध्यक्ष रवि सोनवणे,मनसे ता.उपाध्यक्ष सनी सदाफुले, डाॅ.सचिन घायतडक, सचिन सदाफुले, मुकुंद घायतडक,
विष्णु घायतडक, नामदेव गंगावणे, किशोर सदाफुले, गणेश घायतडक, रवि सदाफुले, विनोद घायतडक, किशोर काबंळे, बाळु काकडे, देवा मोरे, जोगेंद्र थोरात, सुर्यकांत सदाफुले, रवि डाडर, लखन मोरे, दिपक घायतडक, सुव्हास आव्हाड सर, सनी प्रिन्स सदाफुले, प्रतिक सदाफुले, विकीभाई गायकवाड, अजित घायतडक, अक्षय घायतडक, अक्षय गायकवाड, किरण सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले, अरुणा सदाफुले, शैला सदाफुले, कुसुम साळवे आदी शेकडो भिमसैनिक व संविधान प्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.