मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रा राम शिंदे यांची निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील महिला भगिनींसाठी महायुती सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विधानसभा मतदारसंघनिहाय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रा.राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा आदेश 5 ऑगस्ट 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.

Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana, Election of MLA Prof. Ram Shinde as Chairman of Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency wise Committee,

राज्यातील महिल्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी’ ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. या योजनेला राज्यातील महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोट्यावधी महिलांनी या योजनेंतर्गत अर्ज केले आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची संबंधित जिल्हाधिकारी यांनी स्थापना करावी असे शासन आदेश होते. या समितीत 8 शासकीय सदस्यांचा तर 3 अशासकीय सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यातील एक अशासकीय सदस्य सदर समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी गठीत करण्यात येणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रा.राम शिंदे यांची निवड केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्जत-जामखेड विधानसभा स्तरीय 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रा.राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून कर्जत व जामखेडचे तहसीलदार असणार आहेत. या समितीत कर्जत तालुक्यातील खेड येथील धनंजय मोरे व जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील बापुराव ढवळे या दोघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

या समितीत मुख्याध्याधिकारी ( नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद), गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त / सहाय्यक अधिकारी समाजकल्याण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प, बालविकास प्रकल्प अधिकारी, एक अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी कनिष्ठ यांचा समावेश असणार आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सदर समिती गठीत करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.