Corona vaccination in Ahmednagar | अहमदनगर जिल्ह्यात कोविड लस न घेणाऱ्यांच्या सर्व सुविधा होणार बंद; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Corona vaccination in Ahmednagar |  कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगाच्या चिंता वाढवलेल्या असतानाच महाराष्ट्रातही ओमिक्रॉन पसरत चालला आहे.ओमिक्रॉनने मुंबई, पुणेनंतर इतर जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. (Omicron patients started increasing in Maharashtra ) ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासन गतीमान झाले आहे. (Corona vaccination in Maharashtra)

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग (Corona vaccination in Ahmednagar) वाढवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी (Guardian Minister Hassan Mushrif) जिल्हा प्रशासनाची बैठक घेत कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

अहमदनगर जिल्ह्यात लस न घेणाऱ्यांची संख्या 9 लाखांहून अधिक आहे. या लोकांच्या सर्व सुविधा बंद करण्याची घोषणा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (All facilities for non-vaccinators will be closed: Guardian Minister Hasan Mushrif’s big statement)

कोरोनाची (Covid-19 second wave) दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे निश्‍चित झाली असून त्याचा सर्वाधिक धोका 40 पेक्षा कमी वयोगटातील तरुणांनाच असल्याची बाब समोर आली आहे. प्रतिबंधित लस (Covid Vaccine) न घेतलेलेच सर्वाधिक बाधित झाले आहेत. तसेच लस घेणारेही बाधित होत आहे. लस घेणार्‍यांच्या जीवाला धोका कमी आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रोनचा उगम झालेल्या देशातून आले असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. परंतु आज अखेर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेल्या नाही. यामुळे जिल्ह्यात आनंदी आनंद असला तरी अजुनही धोका टळलेला नाही याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकही लस न घेणारे 9 लाख लोक आहेत. (9 lakh unvaccinated people in Ahmednagar district.) तसेच फक्त 1 डोस घेतला पण लस असूनही 5 लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही. अशा परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांच्या गावात पोस्टर लावले जातील आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जातील असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे बोलताना केले आहे.

लोकांनी लसीचे (Corona vaccination) दोन्ही डोस घेतले तर ओमिक्रॉनचा धोका कमी होईल, पण आता लस उपलब्ध असूनही लोक लस देत नाहीत, यामुळे सर्व सुविधा बंद केल्या पाहिजेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी कठोर उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्यामुळे जिल्हा प्रशासन आता कामाला लागले आहे. प्रशासनाकडून कोणता निर्णय अथवा नियमावली जाहीर होते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.