जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात परतीचा पाऊस अनेक भागात कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडत असल्याने धोकादायक ठरत आहे. दौंड परिसरातही गेल्या दोन-तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळी दौंड शहरातील बालाजी नगर परिसरात एका घराच्या छतावर वीज कोसळली. ही वीज कोसळताना चे दृश्य कॅमेर्यात कैद झाले आहे. (daund Electricity crashed directly on the roof of the house, panic spread in the area)
वीस कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घराच्या छतावर वीज कोसळल्याने घराच्या छताचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वीज पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पहा वीज कोसळतानाचा व्हिडिओ ⤵️
दौड : बुधवारी सायंकाळी दौंडमधील एका घराच्या छतावर वीज कोसळण्याची घटना समोर आली आहे.#vairalvideo pic.twitter.com/vCmKD5X6vM
— Jamkhed Times (@JamkhedTimes) October 6, 2021