अरणगावात पार पडले परसातील कुक्कुटपालनाचे प्रात्यक्षिक, हळगाव कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांनी केले मार्गदर्शन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हळगावच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व पशुविज्ञान विभाग अंतर्गत जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे परसातील कुक्कुटपालन या विषयावर चर्चासत्र आयोजित करत प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सखेचंद अनारसे, केंद्र प्रभारी डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ.मनोज गुड, कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ञ डॉ. निकिता धाडगे आदींनी मार्गदर्शन केले.
शेतीला पूरक जोडव्यवसाय ही काळाची गरज बनली आहे . अल्पभुधारक शेतकरी व शेतमजुर यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय म्हणजे परसातील कुक्कुटपालन होय. सदरील आयोजित चर्चासत्रात कोंबड्यांच्या योग्य जातींची निवड, त्यांच्या आरोग्याची काळजी, खुराड्यांची स्वच्छता तसेच या पद्धतीच्या व्यवसायाचे अर्थशास्त्र याबद्दल चर्चा करण्यात आली.
यश अहिरे,साईकिरण अटपलवार,अमेय बागले , ऋत्विक बानकर, सुशांत बिराजदार ,विवेक चांदेवार आणि किरण चव्हाण या कृषिदुतांनी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.