अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित, विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची नियुक्ती !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापन करण्यात आलेली असुन 19 डिसेंबर पासुन प्रत्यक्षात कामास सुरुवातही करण्यात आली आहे. जिल्हयातील नागरीकांनी त्यांची प्रलंबित प्रश्न कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज,निवेदन सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या विषयानुसार जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुख यांनी प्रस्तुत अर्जावर कार्यवाही करणे अपेक्षित असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आढावाही घेण्यात येणार आहे जिल्हास्तरावर प्राप्त होणारे अर्ज व निवेदने यावर कार्यवाही करण्यासाठी या कक्षामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, नायब तहसिलदार किरण देवतरसे व लिपीक एस.एस. कुलकर्णी या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर जिल्हयातील नागरीकांनी त्यांची प्रलंबित प्रश्न कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज,निवेदन सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.