श्री काळोबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, जवळा जिल्हा परिषद गटात राबविण्यात आला अनोखा उपक्रम
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील श्री काळोबा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जवळा जिल्हा परिषद गटात राबविण्यात आला.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या संकल्पनेतून श्री काळोबा ग्रामविकास प्रतिष्ठानने जवळा जिल्हा परिषद गटातील खामगाव, भवरवाडी, पाटोदा, डोणगाव, अरणगाव, कवडगाव, पिंपरखेड, धोंडपारगाव, सरदवाडी, कुसडगाव, रत्नापुर, गिरवली, आघी, चोंडी, जवळा, हळगाव, बावी, पारेवाडी, खांडवी, राजेवाडी, भोगलवाडी, डिसलेवाडी – सुरवसे वस्ती, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, झिक्री सह आदी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 15 ऑगस्ट 2022 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलांचे शिक्षण घेणे अवघड झाले आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यांना ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी सांगितले. या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतूक होत आहे.