DYSP Annasaheb Jadhav takes big action | DYSP आण्णासाहेब जाधव यांनी उचलले मोठे पाऊल : कुख्यात टोळीविरोधात केली मोक्का अंतर्गत कारवाई, गुन्हेगारांचे दणाणले धाबे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। DYSP Annasaheb Jadhav takes big action | कर्जत उपविभागात (Karjat subdivision) संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा उद्रेक वाढला आहे. या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी DYSP आण्णासाहेब जाधव (Aannasaheb Jadhav) यांनी मोठे पाऊल उचलले आहे. कर्जत उपविभागातील एका कुख्यात टोळीविरूध्द (infamous gang) मोक्का अंतर्गत कारवाई (Action under Mocca) करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात (criminal world) मोठी खळबळ उडाली आहे. (DYSP Annasaheb Jadhav takes big action under Mocca against notorious gang in Shrigonda big stir in the criminal world)
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (District Superintendent of Police Manoj Patil) यांनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांच्या माहिती संकलीत करून जिल्ह्यात ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया सक्रिय आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते.
त्यानुसार कर्जतचे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी आपल्या विभागातील सर्व पोलिस ठाण्यात अंतर्गत सक्रीय असलेल्या संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांची माहिती संकलीत करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
पोलिसांनी श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या तालुक्यात सक्रीय असलेल्या संघटीत गुन्हेगारांच्या कुंडल्या जमा करण्यास सुरूवात केली होती. यात श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे या टोळी प्रमुखासह टोळीतील चंदु भाऊसाहेब घावटे (वय २८ रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), राजेंद्र बबन ढवळे (वय ३१, रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), चेतन काळुराम कदम (वय २१, रा. देवदैठण ता. श्रीगोंदा), सागर विनोद ससाणे (वय २१ वर्ष रा. देवदैठण ता. श्रीगोंदा),राजु ऊर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुद ता. पारनेर), शफिक शब्बीर शेख (वय ३४ रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या टोळीने गुन्हे संघटीतपणे केल्याचे निष्पन्न झाले होते.
या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये (Maharashtra Organized Crime Control Act) कारवाई करण्याकरीता बेलवंडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिनांक २६ जून २०२१ रोजी मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांचेकडे पाठवला होता.त्या प्रस्तावास दि. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) (Special Inspector General of Police ) यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली.सदर प्रकरणाचा तपास DYSP आण्णासाहेब जाधव हे करत आहेत.
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीविरुद्ध दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे ,दरोडयाची तयारी करणे, गंभीर दुखापत करणे गुन्हे ,कट करुन व संगणमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करणे आदि प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर टोळीप्रमुख व साथीदार यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंध कारवाई करूनही या टोळीचा गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला होता त्या अनुषंगाने या टोळीविरुध्द प्रचलित कायद्यानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांची मंजुरी मिळाली अशी माहिती DYSP आण्णासाहेब जाधव यांनी दिली.
News by डाॅ अफरोज पठाण,कर्जत
web titel : DYSP Annasaheb Jadhav takes big action under Mocca against notorious gang in Shrigonda big stir in the criminal world