जामखेड तालुक्यात शनिवारी ई केवायसी कॅम्पचे आयोजन, ई केवायसी पुर्ण न झालेल्या शेतकऱ्यांची यादी पटापट आपले नाव तपासून घ्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून ई केवायसी (e-KYC) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 30 गावांमधील ग्रामपंचायतींकडून या कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.
सेवा पंधरवडानिमित्त जामखेड तालुक्यात शनिवारी 30 गावांमध्ये ई केवायसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या गावांमधील 2965 शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे. एकाच दिवसांत शंभर टक्के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
ज्या गावांमधील शेतकरी ई केवायसीपासून वंचित आहेत, त्या गावांमधील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायतचे कर्मचारी व शिपाई यांच्या उपस्थितीत ई केवायसी कॅम्प होणार आहे.
या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी ईकेवायसी प्रलंबित असलेल्या नागरिकांना तात्काळ निरोप द्यावे. गावात दवंडी द्यावी. लाऊड स्पीकर किंवा घंटागाडीवरून प्रचार प्रसार करावा असे अवाहन पोळ यांनी केले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून या कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे.
इ-केवायसी करण्यासाठी येताना आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा. मोबाईल वर OTP येणार असून OTP टाकल्यावरच KYC पूर्ण होईल.
ई केवायसी पुर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 6000 रूपयांचा हप्ता मिळणार नाही. तसेच ई केवायसी पुर्ण न झाल्यास यापुढे योजनेतून वगळले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी तातडीने ईकेवायसी प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.
ई केवायसी पुर्ण न झालेल्या शेतकऱ्यांची यादी, पटापट आपले नाव तपासून घ्या ⤵️⤵️