Eco friendly Ganesh idols made by Muslim students | हिंदू विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक गणेश मुर्ती
रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी घेतली उपक्रमाची दखल
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदू विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली मातीच्या गणेश मुर्त्या साकारल्या आहेत. (Eco friendly Ganesh idols made by Muslim students) हिंदू – मुस्लिम ऐक्याचे (Hindu-Muslim unity) अनोखे उदाहरण जामखेड तालुक्यातील फक्राबाद या गावातून समोर आले आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव (Eco friendly Ganeshotsav 2021) साजरा व्हावा यासाठी बालगोपालांनी उचललेल्या या अनोख्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जामखेड तालुक्यातील फक्राबाद (Fakrabad in Jamkhed taluka) या गावाने समृद्ध गाव व माझी वसुंधरा या अभियानात सहभाग घेतला आहे. सध्या गावात दोन्ही अभियान यशस्वी व्हावे यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत.याच अभियानाला बळ देण्यासाठी फक्राबादमधील बालगोपालांनी एकत्रित येत पर्यावरण पुरक गणेश मुर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. चैतन्य राऊत या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली अबुबकर रज्जाक शेख (इयत्ता पाचवी) , मोहंमद खाजा शेख (इयत्ता पाचवी) , उमर रज्जाक शेख (इयत्ता सातवी) या तीन मुस्लिम विद्यार्थ्यांनी मातीपासून १५ आकर्षक गणेश मुर्त्या साकारल्या आहेत. (Eco friendly Ganesh idols made by Muslim students)
मातीपासून बनवलेल्या गणेश मुर्ती त्यांनी गावातील काही दुकानात व घरात वाटप केल्या. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा अजिंक्य किराणा,चैतन्य टायर्स,महाराजा मोबाईल शाॕपी, श्रावणी मेडीकल, या दुकानांमध्ये तसेच आठ ते नऊ घरांमध्ये करण्यात आली आहे. तसेच पर्यावरण पुरक गणेश मुर्तीबरोबरच देशी झाडांचे रोपटे यावेळी बालचमुंनी गावात वाटप केले. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा हा अनोखा उपक्रम फक्राबाद येथील बालगोपालांनी राबवला. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (Eco friendly Ganesh idols made by Muslim students)
फक्राबादमधील मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिंदू विद्यार्थ्याच्या मदतीने राबवलेल्या पर्यावरण पुरक गणेश मुर्ती बनवण्याच्या उपक्रमाची दखल आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार (MLA Rohit Pawar’s mother Sunandatai Pawar) यांनी घेतली आहे.फेसबुकवर (facebook post) पोस्ट टाकत सुनंदाताई पवार यांनी फक्राबादमधील मुस्लिम विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
काय म्हणाल्या सुनंदाताई पवार ?
फक्राबाद या गावात मुस्लिम मुलांनी गणपती तयार केले. खुप कौतुक वाटले.आनंद ही झाला. जातीपातीच्या पलिकडे माणुस म्हणुन आपण जगले पाहिजे. जातीयतेचे विष माणसांना एकमेकांपासून दूर करतेय व गाव विकासापासून खुप दुर गेलेली पहातोय. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमध्ये होत असलेला बदल निश्चित आनंददायक व इतरांना प्रेरणा देणारा आहे. माणुस जोडण्याची ही प्रक्रिया गणपती बाप्पाच्या कृपेने अशीच चालु रहावो अशीच प्रार्थना.
किराणा दुकानदार काय म्हणतायेत ?
मुस्लिम विद्यार्थ्यांनी राबवलेला पर्यावरण पुरक गणेश मुर्ती बनवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या गणेश मूर्तीची माझ्या दुकानात प्रतिष्ठापणा केली आहे. इथून पुढे दरवर्षी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणार आहे तसेच इतरांनाही प्रोत्साहित करणार आहे – अक्षय जायभाय (किराणा दुकानदार, फक्राबाद)
web taital : Eco friendly Ganesh idols made by Muslim students