सुट्टीच्या दिवशी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी निभावले कर्तव्य, रक्षाबंधनानिमित्त वेळेत पोहचवल्या भावापर्यंत राख्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन हा सण. लाडक्या बहिणीने पाठवलेल्या राख्या भावापर्यंत वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी टपाल खात्यावर असते. परंतु मंगळवारी मोहरमची सुट्टी असून देखील कर्जत- जामखेड- श्रीगोंदा तालुक्यातील पोस्टमन बांंधवांनी पोस्टात आलेल्या सर्व राख्या भावापर्यंत पोहोचवण्याची मोहिम फत्ते केलख अशी माहिती उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांनी दिली.
नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. अशावेळी पोस्टाने राखी पाठवण्यास प्राधान्य दिले जाते. सर्व राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहचवण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते.
डाक विभागाने बहीण-भावाच्या अतूट नात्याला घट्ट करणाऱ्या रक्षाबंधना निमित्त लाडक्या बहिणीने भाऊरायाला पाठवलेली राखी भावाला मिळताच भाऊरायाच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद देणारे असते, अशी भावना पोस्ट कर्मचारी संतोष गदादे यांनी व्यक्त केली.
कर्जत जामखेड श्रीगोंदा या शहरातील तसेच या तालुक्यात सर्वच टपाल कार्यालयांकडून आलेल्या सर्व राख्या भाऊरायाकडे पोहच केल्या. पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने आलेल्या सर्व राख्या पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या.
ही मोहीम कर्जत उपविभागात पोस्टमास्तर रावसाहेब चौधरी, शंकर कडभणे, सागर कलगुंडे, बळी जायभाय, बाळासाहेब वाळूंजकर, महेश दांगट, अविनाश ओतारी, उत्तम शिरसाट, सुबोधकुमार, बापूराव पंडीत, सुनिल धस यांच्या नियंत्रणाखाली पोस्टमन संतोष गदादे रनेश काळे, वेदशास्री वाकळे, आनंद कात्रजकर, राजकुमार कुलकर्णी, भिवसेन खरात, काळे, तुषार डावरे, पाराजी दरेकर, कांबळे,भरत दाताळ, उत्तरेश्वर मिसाळ, दादा धस, सर्फराज शेख तात्यासाहेब समुद्र या पोस्टमनबांधवांच्या उस्फुर्त सहकार्यामुळे राबवली गेली.