Vanraj Andekar Murder Case : प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवमच्या जीवाला धोका, वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी उचलले मोठे पाऊल
Vanraj Andekar Murder Case : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Andhekar) हत्या प्रकरणात पोलिसांनी २१ आरोपींना अटक केली आहे.पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.वनराज आंदेकर (Andekar) खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याची बाब पुढे आली आहे.याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.
वनराज आंदेकर मृत्यू प्रकरणातील मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवम आंदेकर (Shivam Andekar) याच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार त्याच्या वकिलांनी पोलिसांकडे केली होते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून शिवमला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकर हे दोघे नाना पेठ चौकात उभे असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. त्याचबरोबर कोयत्याने हल्ला करत वनराज यांची हत्या केली होती.शिवम आंदेकर यालाही मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांकडून झाला होता. परंतू तो त्यांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो बचावला.
शिवम आंदेकर याच्या जीवाला धोका आहे, त्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पोलिसांकडे शिवमच्या वकिलांमार्फत करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवम आंदेकर याला पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय.
- १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पुण्यातील नाना पेठेत हत्या
- वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ जणांना अटक
- वनराजच्या मारेकर्यांकडून ८ बंदुका १३ राऊंड हस्तगत
- आरोपींकडून सात दुचाकी, एक चार चाकी जप्त
- वनराजच्या हत्याप्रकरणात त्याच्या बहिणींचा सहभाग निष्पन्न
- वनराजच्या हत्याप्रकरणातील आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग
- वनराजचा पुतण्या प्राणघातक हल्ल्यातून बचावला
- शिवमच्या जीवाला धोका, पोलिसांकडून संरक्षण पुरवले जाणार