खळबळजनक : एक चुक अन् खेळ खल्लास; 51 लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा झाला भांडाफोड |
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | पुणे । कस्टम विभागात नोकरी लावण्याचे आमीष दाखवत अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिस उपनिरीक्षकाची बनवेगिरी एका पोलिस पोलिस मित्राच्या प्रसंगवधानामुळे उघड झाली आहे.पोलिस दलाची झोप उडवणारी घटना पुुुण्यातून समोर आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेेत त्या तोतया पोलिस उपनिरीक्षकाने तब्बल 51 लाखांचा गंडा घातला आहे. (The incident of a fake police sub-inspector, who allegedly lured three people with lakhs of rupees to get a job in the customs department, has come to light due to an incident involving a police friend. This has caused a great stir in the state. In this incident, fake police sub-inspector has defrauded three people of Rs 51 lakh in the pune city.
मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत त्याने एका महिलेच्या साथीने तिघांना 51 लाख 17 हजार 400 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, फरासखाना पोलिसांनी तोतया पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय.43,रा.काळेपडळ हडपसर) याला अटक केली आहे. या प्रकरणात तोतया पोलिस उपनिरीक्षकाची साथीदार मैत्रिण सुलोचना दादू सोनवणे (वय.37,रा. टिंगरेनगर) हिच्यासह दोघांच्या विरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक मोहनलाल मुंदडा (वय.51,रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 2017 पासून गुन्हा दाखल होई पर्यंतच्या कालावधीत घडली आहे. आरोपी शिंदे याच्या ताब्यातून पाच ते सहा पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तो असा करायचा फसवणुक
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक मुंदडा हे गणेश मुर्ती विक्रीचा व्यवसाय करतात. 2014 मध्ये गणेशोत्सव काळात मुर्ती खरेदी करण्यासाठी शिंदे हा त्यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्याने तो मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यातुनच पुढे ओळख निर्माण झाली. दरम्यान शिंदे याने फिर्यादींना कस्टम ऑफिस येथील काही अधिकारी आपल्या ओळखीचे असून, तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावू देतो असे सांगितले. मुंदडा यांना तो पोलिस असल्याचे सांगत असल्यामुळे सुरुवातीला विश्वास वाटला. तसेच तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला त्यावेळी त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता. तर दुसरी आरोपी महिला सुलोचना सोनावने ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे.
प्रत्येक वेळी ही महिला त्याच्या सोबत असे. मुंदडा यांना विश्वास वाटावा म्हणून त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे त्यांना साहित्य पाठवून दिले. तसेच त्यांचे मुंबई येथे नेऊन एका रुग्णालयात मेडीकल देखील केले. 2017 मध्ये शिंदे याने मुंदडा व त्यांच्या नात्यातील इतर तरुणांकडून क्लार्क पदासाठी प्रत्येकी 15 लाख व सुप्रिडेंट पदासाठी 25 लाख रुपये सांगून वेळोवेळी सांगून 51 लाख 17 हजार रुपये घेतले. मुंदडा यांनी त्याच्याकडे मुलांच्या नोकरीबाबात विचारणा केली तेव्हा त्याने आपला अपघात झाल्याचे सांगून काही दिवस फोन बंद केला. तसेच कस्टमचे ऑफिस शिफ्ट होत असून नियुक्तीपत्र येण्यास काही दिवस लागणार असल्याचे सांगितले. याच कालावधीत फिर्यादीचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून देखील त्याने त्यांच्या मुलाला नोकरी लावतो असे सांगून पैसे घेतले आहेत.
पोलिस मित्राने फोडले त्याचे बिंग
मागील आठवड्यात शिंदे याने मुंदडा यांना फोन करून तुमच्या मुलाची नियुक्ती पत्र आली आहेत. राहिलेले पैसे घेऊन या अन् नियुक्तीपत्र घेऊन जा असे सांगितले. संगम ब्रिजजवळ त्याने मुंदडा यांना भेटण्यासाठी बोलावले होते. मुंदडा यांनी गाडी पंक्चर झाल्याचे सांगून तोतया शिंदेला कसबा क्षेत्रिय कार्यालय मंगळवार पेठे येथे बोलावून घेतले. यावेळी त्याने खाकी वर्दी अंगावर घातली होती. फिर्यादी यांचा पुतण्या पोलिस मित्र म्हणून काम करत असल्यामुळे त्याला थोडीफार माहिती होती. त्याच्या नजरेतून आरोपी शिंदेचा बनाव जास्त वेळ टिकू शकला नाही. त्याने शिंदेला विचारणा केली असता, तो गडबडून गेला. मुंदडा यांना देखील त्याची शंका आली. मुंदडा यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिस घटनास्थळी येत असल्याचे पाहून शिंदे याने पळ काढण्यास सुरूवात केली. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस व नागरिकांनी त्याला पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
एक चूक अन झाला खेळ खल्लास
या प्रकरणातील आरोपी शिंदे हा नागरिकांना विश्वास वाटावा म्हणून पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश देखील परिधान करत होता. मुंदडा यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्यानंतर राहिलेले पैसे घेण्यासाठी तो बनावट नियुक्तीपत्र घेऊन आला होता. काही वेळातच तो एका चारचाकी गाडीतून आला. यावेळी त्याने गणवेश परिधान करून डोक्याला खाकी टोपी घातली होती. मात्र त्याची चुक पोलिस मित्राच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्याने गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा परिधान केला होता. खांद्यावर दोन स्टार देखील लावले होते. मात्र नेम प्लेट सहायक पोलिस निरीक्षकची लावली होती. ही बाब पोलिस मित्राने हेरली अन त्या तोतया पोलिस उपनिरीक्षकाचा खेळ खल्लास झाला.
पुणे पोलिसांचे अवाहन
आरोपी शिंदे याने त्याच्या मैत्रिणीसोबत मिळून नोकरीच्या आमिषाने 51 लाख 17 हजारांची आर्थिक फसवणूक केली आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून पाच ते सहा पोलिसांचे गणवेश जप्त करण्यात आले आहेत. शिंदे हा मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याची बतवणी करत होता. जर अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी फरासखाना पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.