Chaitanya Maharaj wadekar News : प्रसिध्द कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक, नेमकं प्रकरण काय ?
Chaitanya Maharaj wadekar News : सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध कीर्तनकार (kirtankar) चैतन्य महाराज वाडेकर यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (pimpari chinchwad police) अटक केली आहे. बेकायदेशीरपणे पोकलेनने रस्ता खोदल्याप्रकरणी दाखल गुन्हात त्यांना अटक (Arrest) करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरामध्ये चैतन्य महाराज वाडेकर हे राहतात. त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खोदला.यावेळी त्यांचे इतर एक नातेवाईक आणि दोन बंधू होते. असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत चैतन्य महाराज ?
पुणे जिल्ह्यातील भांबोली ता खेड या गावातील चैतन्य महाराज वाडेकर रहिवासी आहे. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९९४ साली भांबोली गावात झाला.त्यांचं माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे झाले.त्यांनी आळंदीत संत साहित्याचं शिक्षण पुर्ण केलं.आपल्या अनोख्या शैलीतील कीर्तनामुळे ते अल्पावधीत प्रसिध्द झाले. ते सध्या पिंपरी चिंचवड परिसरात राहतात. इन्स्टाग्राम व युट्यूब या दोन्ही सोशल मिडीया साईटवर चैतन्य महाराज यांचे व्हिडीओ नेहमी वायरल होतात.प्रेरणादायी विचार देणारे त्यांच्या व्हिडीओंना लाखोंनी व्हूज आल्याचे पाहायला मिळते. त्यांचा राज्यात मोठा चाहता वर्ग आहे.
मदालसा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना
चैतन्य महाराज वाडेकर यांनी वारकरी संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदालसा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापन केली आहे. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमांतून ते काम करत आहेत. युवा कीर्तनकार म्हणून ते राज्यात प्रसिद्ध आहेत. कीर्तन करण्याच्या खास शैलीमुळे ते राज्यात लोकप्रिय आहेत. त्याचे अनेक प्रेरणादायी व्हिडीओ दररोज अनेकांच्या स्टेटसला पाहायला मिळताच. राज्यभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाल्याने राज्यभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.