जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana | ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या ; मात्र अद्याप ‘केवायसी’ (Online KYC(ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी 31 जूलै 2022 पर्यंत ऑनलाईन ‘केवायसी’ (KYC) करून घ्यावी. अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे आवाहन ‘पीएम किसान’ (PM Kisan) योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन ‘केवायसी’ करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम ‘मे 2022 ‘ पर्यंत राबविण्यात आली. या मोहीमेस 31 जूलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील 41.11 टक्के लाभार्थ्यांची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी Pradhan Mantri Kisan Samman Nidhi पीएम किसान या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ ॲपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
आपल्या नजीकच्या ‘ग्राहक सेवा केंद्रा’वर 15 रूपयांच्या नाममात्र शुल्कात ‘केवायसी’ बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. असे आवाहनही निचित यांनी केले आहे.