Swarajya Dhwaj Yatra | बालगोपालांनी केले स्वराज्य ध्वजाचे स्वागत : स्वराज्य ध्वज यात्रा अंतिम टप्प्यात, गावोगावी होतेय जंगी स्वागत
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Swarajya Dhwaj Yatra | येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा येथील भुईकोट किल्ला मैदानावर बसवल्या जाणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाची यात्रा अंतिम टप्पात आली आहे. ही यात्रा जामखेड तालुक्यातील विविध गावांमधून जात आहे. यात्रेचे गावोगावी जल्लोषात स्वागत केले जात आहे. या स्वागतास सर्व वयोगटातील लोक सहभागी होत आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत ते बालगोपाल.(final stages of the Swarajya Dhwaj Yatra welcome taking place in every village Swarajya Dhwaj Yatra)
चिमुकल्यांमध्ये स्वराज्य ध्वज यात्रेचा मोठा उत्साह आहे. स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत करण्यासाठी चिमुकले सरसावले आहेत. मंगळवारी तालुक्यातील तेलंगशी येथे स्वराज्य ध्वज यात्रा धडकली होती.
तेलंगशीत आलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मोठ्या उत्साहात स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा सर्व विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून स्वराज्य ध्वजास अभिवादन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दुतर्फा रांगेत थांबून अत्यंत शिस्तमय वातावरणात स्वराज्य ध्वजावर पुष्पवृष्टी केली.
स्वराज्य ध्वजाचे तेलंगशी गावात सामूहिक पूजन करण्यात आले. यावेळी सुनंदाताई पवार, सरपंच नवनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय, मुख्याध्यापक अनंता गायकवाड,पदवीधर शिक्षक संतोष गोरे, सुशेन चेंटमपल्ले , विजयकुमार रेणुके व लक्ष्मी जायभाय सह आदी उपस्थित होते.