Big News । CBI arrested Anil Ramod : अखेर लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना CBI कडून अटक, रामोड यांच्या 14 स्थावर मालमत्तांची कागदपत्रे आणि 6 कोटी रूपयांची रोकड CBI ने केली जप्त !
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून महसुल विभागाच्या (Revenue Department Pune) पुणे कार्यालयात अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त (Additional Revenue Divisional Commissioner) म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ IAS अधिकारी अनिल रामोड (Anil ramod cbi raid) यांना 8 लाख रूपयांच्या लाचखोरी प्रकरणी CBI ने अटक केली आहे. सीबीआयने अनिल रामोड (CBI arrested IAS Anil Ramod ) यांच्या बाणेर येथील ऋतूपर्ण सोसायटीतील निवासस्थान आणि इतर ठिकाणी (Rituparna Society Baner Pune) टाकलेल्या धाडीत 6 कोटी रूपयांचे घबाड मिळाले आहे. कागदपत्रे आणि रोकड जप्त केल्यानंतर सीबीआयने अनिल रामोड (Anil ramod arrested in pune) यांना शुक्रवारी 9 जून 2023 रोजी रात्री उशिरा अटक केली आहे. ही कारवाई सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ (CBI DIG Sudhir Hiremath ) यांच्या पथकाने पार पाडली.
महामार्गालगत असलेल्या जागेचा परतावा लवकर देण्यासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने रामोड यांची सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने शुक्रवारी 9 जून 2023 दुपारी 8 लाख रूपयांची लाच स्वीकारताना अनिल रामोड यांना रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई रामोड यांच्या कार्यालयात करण्यात आली होती. सीबीआयने अनिल रामोड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल पाच ते सहा तास त्यांची कसून चौकशी सुरू होती. रामोड यांची चौकशी सुरू असतानाच सीबीआयने महसुल विभागीय आयुक्त कार्यालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या चौकश्या सुरू केल्या होत्या. याशिवाय रामोड यांच्याशी संबंधित पुण्यातील तीन ठिकाणी सीबीआयने धाडीत टाकल्या होत्या. यात अनिल रामोड यांच्या सरकारी कार्यालय आणि निवासस्थानाचा समावेश होता. तसेच नांदेडमध्ये सीबीआयने धाड टाकल्याने बोलले जात आहे.
सीबीआयने IAS अधिकारी अनिल रामोड यांच्या पुण्यातील बाणेर येथील ऋतूपर्ण सोसायटीतील निवासस्थानी धाड टाकली. 15 ते 20 सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. तीन ठिकाणी टाकलेल्या या धाडीत सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागले. Anil Ramod यांच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत सीबीआयने तब्बल 6 कोटी रूपयांची रोकड जप्त केली आहे.
डाॅ अनिल गणपतराव रामोड असे अटक केलेल्या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. रामोड हे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून पुणे महसुल विभागात कार्यरत होते. त्यांच्याकडे सातारा आणि सोलापुर जिल्ह्यांचे NHAI लवाद होते. त्यांच्याविरुद्ध लाचखोरीची तक्रार सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्याने CBI कडे केली होती. CBI तक्रारीची पडताळणी करत IAS अधिकारी अनिल रामोड यांना 8 लाखाची लाच घेताना आज रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या सखोल चौकशीनंतर CBI ने अनिल रामोड यांना शुक्रवारी रात्री अटक केली.
सीबीआयने अनिल रामोड यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर पुण्यातील तीन ठिकाणी धाडी टाकल्या, या ठिकाणी झडती घेतल्यानंतर सीबीआयला 6 कोटींची रोकड आणि रामोड आणि त्यांच्या कुटुबियांच्या नावे असलेल्या 14 स्थावर मालमत्तांसंबंधी कागदपत्रे मिळाले. गुंतवणूक आणि बँक खाते तपशील इतर दोषी कागदपत्रांवरून जप्तीची कारवाई करत अनिल रामोड यांना अटक करण्यात आली आहे. उद्या 10 जून रोजी अटकेतील IAS अधिकारी अनिल रामोड यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
…म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर कारवाई
पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना सीबीआयने पकडले. पुणे विभागात पहिल्यांदाच आयएएस असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जमिन भूसंपादनाचा मोबदला मान्य नसल्याने संबधित शेतकरी यांनी याविरुध्द अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्याकडे दाद मागितली होती. यावर अपिल सुरु होते. भूसंपादन मोबदल्याचे अपिल मान्य करण्यासाठी तक्रार यांच्याकडे आठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.
याप्रकरणी तक्रारदार यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुक्रवारी रामोड यांनी कार्यालयात लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले. दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेली कारवाई सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण झाली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने रामोड यांना ताब्यात घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस ( Solapur Malshiras) तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचे संपादन महामार्गासाठी करण्यात येणार होते.त्यापोटी भूसंपादनाचा दर संबंधित शेतकऱ्याला मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.रामोड यांच्याकडे अपिल दाखल केले होते. भूसंपादनाच्या प्रकरणात न्यायनिवाडा करण्यासाठी शासनाने लवाद म्हणून रामोड यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार रामोड यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी सुरु होती. अशी अनेक प्रकरणाची सुनावणी रामोड यांच्याकडे सुरु होती.
माळशिरस येथील प्रकरणात ज्येष्ठ वकिलाकडे लाच मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी या वकिलांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनुसार सीबीआयकडून मागील 15 दिवसांपासून माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विधानभवन येथील अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात रामोड यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.सीबीआयची कारवाई झाल्याचे कळताच रामोड यांनी चक्कर आल्याचे नाटक केले.
त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रामोड यांना पाणी दिले. त्यानंतर याप्रकरणाची त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल साडेपाच तास सुरु होती. यानंतर रामोड यांना सीबीआयने ताब्यात घेतले, त्यानंतर सीबीआयकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली.दरम्यान, महसुल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर सीबीआयने अचानक धाड टाकल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.