जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहराच्या राजकारणात गुरुवारी मोठा भूकंप झाला आहे.जामखेडचे माजी सरपंच प्रा कैलास माने यांनी थेट शिवसेनेच्या शिंदे गटात एन्ट्री करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने जामखेड शहराचे राजकीय गणिते पुर्णता: बदलून गेले आहेत.
जामखेडचे माजी सरपंच प्रा कैलास माने यांनी आपल्या समर्थकांसह आज अहमदनगर येथे शिंदे गटात प्रवेश केला आहे. माने यांनी शिंदे गटात प्रवेश करताच माने यांच्या खांद्यावर पक्षाने जामखेड तालुका प्रमुख पदाची धुरा सोपवली आहे.
जामखेड तालुक्यात शिवसेना शिंदे गटात कोण जाणार याची सर्वांनाच उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शिंदे गटाच्या गळाला जामखेड तालुक्यातून मोठा मासा आज लागला. जामखेडचे माजी सरपंच प्रा कैलास माने यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, पाथर्डी तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे, शेवगाव तालुका प्रमुख अशुतोष डहाळे, जामखेड तालुका उपप्रमुख संतोष वाळूंजकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अहमदनगर येथे पार पडला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या जामखेड तालुका प्रमुखपदी प्रा कैलास माने यांना निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
यावेळी कपिल माने,अभिजीत माने,सोहेल तांबोळी, बबलू जाधव, गणेश जाधव, अनिकेत जाधव, ऋषीकेश जाधव, अरबाज शेख, अजहर शेख, अक्षय गुरसाळे, राहूल माने, अक्षय शिंदे, विशाल काशिद, आनंद भोज, यश जाधव, अवधूत वासकर, रोहित राऊत सह आदी उपस्थित होते.