जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। साहेब, विधानपरिषदेचे आमदार झालेले सहा महिने झाले, पण अजून विरोधकांनी त्यांचे अभिनंदन केले नाही, एखाद्याकडे श्रीमंती असेल पण त्याच्याकडे जर मॅनर्सच नसतील तर काय कामाचे ते, तुम्ही जर निवडून आल्यावर अभिनंदन करत नसताल तर तुमचे संस्कार आहेत का ते, असे म्हणत माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांचे चांगलेच वाभाडे काढले.
यावेळी पुढे बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, शिंदे साहेबांना हरवून ते आपल्या घरी आले, आल्यावर साहेबांनी त्यांचा सत्कार केला, आता तर त्यांचं पद आहे तसचं आहे, साहेबांनी अजून त्यांच्या पदाला कुठं धक्का लावलाय का ? ते पुढचं पुढं होईल ना आता, तुम्ही सगळे सोबत आहात करू ना आता बरोबर, असे म्हणत शिंदे यांनी अगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत अशी गर्जना केली.
शिंदे पुढे म्हणाल्या, आता त्यांच्या पदाला आपल्याकडून काही आहे का? आपल्या इथं माणसं किती मोठ्या मनाची आहेत, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात बाहेरच्या महिला रात्री अपरात्री येऊन फिरतात ही किती मोठी गोष्टय, आपली माणसं चांगली आहेत, आपल्याकडं माणुसकी आहे, आपल्याकडे चांगले संस्कार आहेत, एखाद्याकडे श्रीमंती असेल पण त्याच्याकडे मॅनर्सच नसतील तर काय कामाचे ते, तुम्ही जर निवडून आल्यावर अभिनंदन करत नसताल तर तुमचे संस्कार आहेत का ते असे म्हणत शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
शिंदे पुढे म्हणाल्या की, तुम्ही सांगा साहेब पडले त्या दिवशी त्यांनी विरोधकांना घरी बोलवून त्यांचा सत्कार केला, ते म्हणले साहेब खोटं बोलले, नाही बोलवलं, मी म्हणते साहेब खोटं बोलले, नाही बोलवलं, पण तुम्ही विनंती केली येण्याची, पण अशी कुठली व्यक्तीय का ज्याने आपला परायज केलाय तो व्यक्ती आपल्या घरी आल्याच्यानंतर त्याला मानसन्मान दिलाय, तर तो आपल्या साहेबांनी तीन वर्षापुर्वी विरोधकांचा मानसन्मान केला होता, असे सांगत शिंदे यांनी त्या सत्काराची रोहित पवारांना आठवण करून देत चांगलेच कोंडीत पकडले आहे.
नथीची खरी कहाणी सांगितली आणि आपल्या गावातील म्हातारीची पंचाईत झाली, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण मी जामखेडच्या कार्यक्रम नथीचा जो किस्सा सांगितला तो खरा होता का खोटा होता हे तुम्हीच सांगा असे माजी सभापती आशाताई शिंदे म्हणताच उपस्थित सर्व महिलांनी नथीचा किस्सा खरा होता असे मोठ्या आवाजात सांगितले.
आपल्यामुळे दुसरे अडचणीत नको म्हणून मी आता कोणाचं नाही घेत नाही, आम्ही सक्षम आहोत, तुम्ही आमच्या पाठीशी आहात तर मग कोणाला भ्यायची गरज नाही आम्हाला, जे असतील ते आपल्या घरचे, आपलं गावयं, आपण काय बाहेरून आलोत का, ते येऊन फिरणार फसवायला आणि लुबाडायला, आपण त्यांच्या मागं पळतोत, पण आता जागे व्हा, थोडा वेळ गेलाय पण लक्षात घ्या, आपलं आपलयं ना ? आपण जे केलं, आपली जी चुक झाली, ती झाली असेल, मान्यय, आपण ती स्वीकारू, आता वेळ आहे चुक सुधारण्याची, तुम्ही चुक सुधारू शकता, असे म्हणत शिंदे यांनी जनतेला जनतेला भावनिक साद घातली.