Four-wheeler and two-wheeler license testing sub-center started in Choundi | चौंडीत चारचाकी व दुचाकी वाहन परवाना चाचणी उपकेंद्र सुरू
चौंडीत कार्यान्वित होणार सौर ऊर्जा प्रकल्प
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प Solar power project उभारला जाणार असून या प्रकल्पाचा चौंडीतील शेतकऱ्यांना होईल असे सांगत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करू शकता असे अवाहन सुनंदाताई पवार यांनी केले. Solar power project will be commissioned in Choundi
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आरटीओ वाहन परवाना चाचणी केंद्राचा शुभारंभ आज 28 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होत्या. Four-wheeler and two-wheeler license test sub-center started at Choundi
यावेळी प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसेन, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड , सभापती सूर्यकांत मोरे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या कि, विना परवाना वाहन चालवणे धोकादायक आहे. वाहन चालवतांना रस्त्याचे व वाहनाचे नियम माहीत असणे गरजेचे आहे. मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय त्याना वाहन चालविण्यास देऊ नये असे अवाहन सुनंदाताईंनी पालकांना केले.
चोंडी येथे सौर ऊर्जा प्रकल्प Solar power project उभारण्यात येत असून त्याचा फायदा चौंडी गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना होईल. शेतामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करू शकता यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे अवाहन पवार यांनी केले.
दरम्यान कर्जत व जामखेड तालुक्यातील १४ हजार नागरिकांनी वाहन परवाना मिळावेत यासाठी आरटीओ कार्यालयाकडे अर्ज केले होते. त्यापैकी ४५०० अर्जांचे वितरण केले आहे असे आरटीओ अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कर्जत-जामखेड तालुक्यातील लोकांना पक्के वाहन काढण्यासाठी अहमदनगर येथे जाण्याचा त्रास वाचवा यासाठी चोंडी ता. जामखेड येथे चारचाकी व दुचाकी वाहनांची चाचणी घेण्यासाठी उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. (Four-wheeler and two-wheeler test sub-center started at Choundi) या केंद्राचा दि. 28.12.2021 रोजी सुनंदाताई पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला . त्यामुळे कर्जत – जामखेड मधील लोकांचा अहमदनगर येथे जाण्याचा त्रास वाचणार असून यामुळे वेळ व पैशाची बचत होणार आहे.
एजंटमार्फत शिकाऊ वाहन परवाना आणि कायम स्वरूपी वाहन परवाना काढण्यासाठी सुमारे 4000 ते 5000 पर्यंत खर्च करावा लागतो. शिकाऊ वाहन परवाना मोफत देण्यामुळे मुलांचे 1000 ते 1500 रु. वाचत आहेत. याशिवाय कर्जत-जामखेडमधील ड्रायव्हिंग स्कूल चालकांना पक्के लायसन काढण्यासाठी अतिशय वाजवी दर आकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील कालावधीत जास्तीत-जास्त तरुणांना मोफत शिकाऊ वाहन परवाना देण्याचा हा उपक्रम चालू राहणार आहे.