1631 किमीच्या 937 कामांना निधी द्या – आमदार रोहित पवारांची रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची नुकतीच भेट घेतली आणि निधी देण्याची मागणी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील पाणंद रस्त्यांची कामे व्हावीत यासाठी प्रत्येक गावामध्ये ४ ते ५ रस्ते शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रस्तावित करण्यात आले होते. त्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डरचे वितरण करण्यात आले होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील १६३१ किमीच्या ९३७ पाणंंद कामांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी आमदार रोहित पवार यांनी मंत्री संदिपान भूमरे यांच्याकडे नुकतीच केली आहे.