आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून 24 कोटींचा निधी मंजूर, कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात सुरु, जनतेत आनंदाचे वातावरण
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष 5054(4) अंतर्गत तब्बल 24 कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यातील 21 कोटींचा निधी जामखेड तालुक्यासाठी तर 3 कोटींचा निधी कर्जत तालुक्यासाठी मंजुर झाला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी असे साकडे मतदारसंघातील जनतेकडून आमदार प्रा.राम शिंदे यांना घालण्यात आले होते. जनतेच्या या मागणीची आमदार प्रा.राम शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमांतून मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार राम शिंदे यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या जोरदार पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 9 रस्त्यांसाठी तब्बल 24 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामे व्हावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे नेहमीच आग्रही असतात. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणला होता. आमदार शिंदे यांच्या दुरदृष्टीमुळे कर्जत-जामखेडमध्ये विकास कामांचा मोठा डोंगर उभा राहिला होता. विकासाचा हाच झंझावात पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्माण झाला आहे.
अवघ्या महिन्याभरात 75 कोटींची विकास कामे मंजुर करून आणण्यात आमदार प्रा.राम शिंदे यांना यश आले आहे. विरोधकांच्या टीका टिप्पणीच्या राजकारणात न अडकता आमदार प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघात विकास कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यामुळे आमदार प्रा.राम शिंदे यांची विकासपुरुष ही बिरुदावली पुन्हा एकदा मतदारसंघात चर्चेत आली आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेली विकासकामे खालीलप्रमाणे
1) सातेफळ -लोणी – आनंदवाडी- बांधखडक- तेलंगशी रस्ता प्रजिमा 107 किमी 4/700 ते 8/100 रस्ता सुधारणा करणे (भाग वाकी ते लोणी फाटा ) मंजुर निधी – 2 कोटी 50 लाख रूपये
2) रामा 57 ते राजुरी – आपटी – सोनेगाव रस्ता प्रजिमा 72 किमी 3/450 ते 4/000 रस्ता सुधारणा करणे ( भाग पिंपळगाव आळवा गावाजवळ ) मंजुर निधी – 1 कोटी रूपये.
3) शिऊर- नाहुली- देवदैठण- धामणगाव- तेलंगशी रस्ता प्रजिमा 73 किमी 5/250 ते 8/600 रस्ता सुधारणा करणे (भाग नायगाव फाटा ते नाहुली ) मंजुर निधी – 3 कोटी रूपये.
4) शिऊर- नाहुली- देवदैठण- धामणगाव- तेलंगशी रस्ता प्रजिमा 73 किमी 12/00 ते 19/500 मध्ये रस्ता सुधारणा करणे ( भाग नाहुली ते धामणगाव) मंजुर निधी – 5 कोटी रूपये.
5) रामा 55 ते आनंदवाडी – नायगाव- देवदैठण- साकत – कोल्हेवाडी ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा 74 किमी 14/000 ते 15/300 व किमी 18/500 ते 19/500 (कोल्हेवाडी गावातील लांबी) मध्ये काँक्रीटीकरण व रस्ता सुधारणा करणे (भाग साकत गांव) मंजुर निधी – 2 कोटी 50 लाख रूपये
6) रामा 55 पासून अरणगाव- पिंपरखेड- हळगाव ते जवळा प्रजिमा 102 किमी 5/500 ते 6/500 पिंपरखेड गावातील लांबी काँक्रीटीकरण करणे, मंजुर निधी – 2 कोटी 50 लाख रूपये
7) रामा 55 पासून अरणगाव- पिंपरखेड- हळगाव ते जवळा प्रजिमा 102 किमी 7/800 ते 9/800 गावातील लांबी सुधारणा करणे ( भाग पिंपरखेड ) मंजुर निधी – 1 कोटी 50 लाख रूपये
8) रामा 57 ते जामखेड- जमदारवाडी – सारोळा – खुरदैठण- गुरेवाडी – धोंडपारगांव रस्ता प्रजिमा 106 किमी 3/00 ते 6/00 मध्ये सुधारणा करणे (भाग जमदारवाडी ते सारोळा ) मंजुर निधी – 3 कोटी रूपये
9) रामा 60 ते निमगाव खलू – अजनूज – पेडगाव – शेडगाव – जलालपुर- सिध्दटेक फाटा रामा 68 रस्ता प्रजिमा 03 किमी 20/200 ते 22/900 व 26/100 ते 27/300 मध्ये सुधारणा करणे (भाग शेडगाव फाटा ते सिध्दटेक फाटा) मंजुर निधी – 3 कोटी रूपये