मोठी बातमी : कर्जत – जामखेड मतदारसंघासाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले मोठे यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सुरु केलेल्या पाठपुराव्याला आता मोठे यश मिळाले आहे. मतदारसंघातील 45 गावांसाठी तब्बल 5 कोटी रूपयांच्या निधीस मंजुर मिळाली आहे. तसा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून जारी करण्यात आला आहे. एकाच वेळी 45 गावांसाठी भरघोस निधी मिळाल्यामुळे जनतेतून आमदार प्रा राम शिंदे यांचे अभिनंदन केले जात आहे.
राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून गावांतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुलभूत सुविधांच्या ( लेखाशिर्ष 2515) कामांचे विविध प्रस्ताव आमदार प्रा राम शिंदे यांनी ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. या कामांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात कर्जत-जामखेड मतदारसंघात 45 गावांमधील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसा शासन निर्णय अहमदनगर सार्वजनिक बांधकामास जारी करण्यात आला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार राम शिंदे सरसावले असून त्यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्याला आता भरीव असे यश येत असल्याचे दिसत आहे. यामुळे मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यातील मंजुर कामे खालीलप्रमाणे (रक्कम लाखात)
1) कोकणगाव येथे दशक्रिया विधि ओटा बांधणे – 10 लाख रूपये
2) चांदे बुद्रुक येथे संत सावतामाळी मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
3) खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
4) थेटेवाडी येथे स्मशानभूमी बांधणे – 10 लाख रूपये
5) रवळगाव येथे स्मशानभूमी सुशोभीकरण काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
6) चिंचोली रमजान येथे माळेवाडी येथील काळुबाई मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
7) कौडाणे येथे मधला मळा पाटील वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
8) ताजू येथे घोड कालव्यावर पूल बांधणे – 10 लाख रूपये
9) करमणवाडी येथे पावणेवस्ती येथे अंगणवाडी बांधणे – 10 लाख रूपये
10) आखोणी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
11) मलठण येथे रामकृष्ण शरनजी महाराज मठ येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे – 20 लाख रूपये
12) शेगुड येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
13) सितपूर येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
14) जळगाव येथे भैरवनाथ मंदिर कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
15) नागलवाडी येथे नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
16) निंबोडी येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे.
17) तरडगाव येथे बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
18) कुंभेफळ येथे हनुमान मंदिर ते राजेश दोधाड वस्ती सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
19) धांडेवाडी येथे बबन धांडे ते नलवडे वस्ती सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – 20 लाख रूपये
20) आळसुंदे येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
21) वडगाव तनपुरा येथे भिवाई मंदिरासमोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
22) सुपा येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
23) खंडाळा येथे भैरवनाथ मंदिरासमोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
24) पठारवाडी येथे भीमराव चौधरी घर ते पोपट नंदू गोडसे यांचे घर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
25) शिंदेवाडी येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
26) भांबोरा येथे लक्ष्मीआई मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
27) बारडगाव सुद्रिक येथे चौक सुशोभीकरण करणे – 25 लाख रूपये
28) नवसरवाडी येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
29) खातगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे – 20 लाख रूपये
30) बेनवडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 15 लाख रूपये
जामखेड तालुक्यातील मंजुर कामे खालीलप्रमाणे (रक्कम लाखात)
1) अरणगाव येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
2) डिसलेवाडी येथे मारुती मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
3) जवळा येथे गोयकरवाडी येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
4) कुसडगाव येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
5) नागोबाचीवाडी मुंगेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरसमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
6) पिंपळगाव आळवा येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे – 10 लाख रूपये
7) चोभेवाडी येथे स्मशानभूमी संरक्षित भिंत बांधणे. ता.जामखेड जि. अहमदनगर
8) तरडगाव येथे वंजारवाडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
9) शिऊर येथे श्री. भैरवनाथ मंदिर परिसर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
10) राजुरी येथे दत्तात्रय डोंगरे यांचे घर ते नदीपर्यंत काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
11) हाळगाव येथे बस स्थानकावरील भगवा ध्वज या ठिकाणी काँक्रीटीकरण करणे -10 लाख रूपये
12) नाहुली येथे श्री, म्हसोबा मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
13) नायगाव येथे म्हसोबा मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
14) सातेफळ येथे जि.प.प्रा. शाळा खोली बांधणे – 10 लाख रूपये
15) तरडगाव येथे जि.प.प्रा. शाळा खोली बांधणे 10 लाख रूपये