जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी शासनातर्फे 7 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय मतदारसंघातील इतर देवस्थानांच्या विकासासाठी 1 कोटी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही
चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमादरम्यान येथील विविध प्रलंबित चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे संग्रहालय बांधणे, जन्मस्थळी असलेल्या सीना नदीच्या घाटाचे काम व सुशोभीकरण करण्याचे काम यासोबतच चौंडीला 2 नवीन भव्य कमान उभारण्याचे काम या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
साहेब लाल दिवा घेऊन लवकर मतदारसंघात या… कर्जत – जामखेडकरांना लागले राम शिंदेंच्या मंत्रीपदाचे वेध !
यासाठी 7 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णय क्रमांक विकास-2022/प्र. क्र.50/भाग-3/योजना-6 यानुसार संबंधित आदेश देण्यात आले आहेत. तसेच कर्जत – जामखेड मतदारसंघात असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मंजूर करून आणण्यात रोहीत पवारांना यश आले आहे.
तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा,राज्यपालांकडे बीडच्या शेतकऱ्याची मागणी !
खालील देवस्थानांना भरघोस निधी मंजूर
- खंडोबा मंदिर, देवदैठण- घाट बांधकाम व सुशोभीकरण 35 लाख
- नंदादेवी मंदिर, नान्नज – सभामंडप बांधकाम – 25 लाख
- कोरेश्वर मंदिर, कोरेगाव – दगडी सभामंडप बांधकाम – 25 लाख
- जगदंबा देवी मंदिर, राशीन – सुशोभिकरण व विद्युतीकरण – 30 लाख
- लालगिर स्वामी मंदिर, मांदळी – सभामंडप व स्वयंपाक खोली बांधकाम – 50 लाख रुपये
या व्यतिरिक्त मतदारसंघातील 2515 अंतर्गत येणाऱ्या इतर विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून मतदारसंघातील गावांना 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कर्जत व जामखेडमधील प्रलंबित असलेली अनेक विकास कामे गेल्या 2 वर्षात आ. रोहीत पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याच पाहायला मिळत आहे.