जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाच्या आगमनाबरोबरच पावसानेही काही भागात हजेरी लावली. पावसातच वाजत गाजत गणेश भक्तांकडून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. जामखेड तालुक्यातील एकुण 87 गावांमध्ये गणरायाचे आगमन झाले.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून जामखेड पोलिस प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या एक गाव एक गणपती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. जामखेड तालुक्यातील 18 गावांमध्ये ‘एक गाव – एक गणपती’ बसवण्यात आले आहेत. तर जामखेड शहरात 29 ठिकाणी गणपती बसविण्यात आले आहेत,अशी माहिती जामखेड पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
जामखेड पोलिस स्टेशन अंतर्गत 51 गावांचा समावेश होतो. यामध्ये 18 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला. एकुण 60 ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणपती बसवण्यात आले आहे. 60 पैकी 38 ठिकाणी मोठे गणपती तर 22 लहान गणपती बसविण्यात आले आहेत. यामध्ये जामखेड शहरातील 29 गणपती मंडळांचा समावेश आहे.
खालील गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम
1) शिऊर
2) धोंडपारगाव
3) खुरदैठण
4) कुसडगाव
5) सावरगाव
6) कवडगाव
7) महारुळी
8) गुरेवाडी
9) राजेवाडी
10) फक्राबाद
11) धानोरा
12) वंजारवाडी
13) सारोळा
14) डोकेवाडी
15) काटेवाडी
16) गिरवली
17) धोत्री
18) पाडळी
खर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत एकुण 32 गणेश मंडळांकडून सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती खर्डा पोलिस स्टेशनकडुन देण्यात आली आहे.