जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत जामखेड मतदारसंघातील 40 गावात जलजीवन मिशन अंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी केेेलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. (Govt sanctioned Rs 42.48 crore under Jaljivan Mission in 40 villages of Karjat Jamkhed constituency)
कर्जत – जामखेड मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द आमदार रोहित पवार यांनी दिला होता. त्यानुसार पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. जल जीवन मिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील 19 तर जामखेड तालुक्यातील 21 अशा एकूण 40 गावांमध्ये कामे होणार आहेत.
संबंधित गावांचे प्रस्ताव दरडोई खर्च कमी असल्याने जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी होते. परंतु, सोलारचा योजनेतील समावेश व डीएसआर किमतीतील बदल या सर्व गोष्टींमुळे जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी असणारे हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले. तसेच त्याच्या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. यासोबतच अतिरिक्त वाड्या, वस्त्या व गावे देखील जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट होण्यासाठी आमदार रोहित पवार लक्ष घातले आणि त्यास यश मिळाले.
जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांची तालुकानिहाय यादी खालील प्रमाणे
कर्जत तालुका
१. निंबे
२. शिंपोरा
३. होलेवाडी
४. म्हाळगी
५. रातंजन
६. शेगुड
७. वडगाव तनपुरा
८. औटेवाडी
९. कुंभेफळ
१०. खंडाळे
११. निंबोडी
१२. कोळवडी
१३. तिखी
१४. बिटकेवाडी
१५. दिघी
१६. लोणी मसदपुर
१७. तोरकवाडी
१८. खातगाव
१९. कांगुडवाडी
जामखेड तालुका
१. बावी
२. माहरुळी ( गुरेवाडी)
३. गुरेवाडी
४. पारेवाडी (आरणगाव)
५. राजेवाडी
६. आनंदवाडी
७. धानोरा
८. सातेफळ
९. धोंडपारगाव
१०. चोभेवाडी
११. पिंपळगाव आळवा
१२. खुटेवाडी- मुंजेवाडी
१३. बोर्ले
१४. घोडेगाव
१५. भवरवाडी
१६. खामगाव
१७. सांगवी
१८. झिक्री
१९. आघी
२०. खुरदैठण
२१. तरडगाव