जामखेड टाइम्स वृत्तसेवा : हॉटेल व लॉजिंगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव व एनओसी प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना महिला ग्रामसेविकेला रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 जूलै रोजी पार पाडली.या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Solapur ACB Trap News)
याबाबत सविस्तर असे की, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी (Akolekati Gram Panchayat, North Solapur, District Solapur) ग्रामपंचायतकडून एका 26 वर्षीय व्यक्तीस हॉटेल व लॉजिंग साठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव व एनओसी प्रमाणपत्र हवे होते. सदर व्यक्तीने याबाबतची मागणी अकोलेकाटी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका किर्ती अर्जुनराव वांगीकर ( वय 43 वर्ष) (Gramsevika Kirti Arjunrao Vangikar) यांच्याकडे केली होती.त्यासाठी ग्रामसेविका किर्ती अर्जुनराव वांगीकर यांनी संबंधित व्यक्तीकडे 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती.
प्राप्त तक्रारीनुसार केलेल्या पडताळणीमध्ये ग्रामसेविका किर्ती अर्जुनराव वांगीकर यांनी ग्रामपंचायतीचा ठराव व एनओसी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दिनांक 17/07/2023 रोजी सापळा कारवाईमध्ये किर्ती अर्जुनराव वांगीकर यांनी लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांचेवर सदर बजार पोलीस ठाणे सोलापूर शहर (Sadar Bazar Police Station Solapur City) येथे गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरू आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe) व अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे/खराडे (Adl SP Shital Janave-kharade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार (DYSP Ganesh Kumbhar) यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस हेड कॉन्स्टेबल शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, पोलिस शिपाई राजू पवार व चालक राहुल गायकवाड यांचा समावेश होता.
सापळा कारवाई
➡ घटक:- सोलापूर
➡ तक्रारदार : – पुरुष, वय 26 वर्षे
➡ आरोपी : आरोपी लोकसेवक
श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर, वय 43 वर्ष, पद ग्रामसेवक ग्रामपंचायत अकोलेकाटी, ता.उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर
➡ मागणी केलेल्या लाचेची :- 10,000/-रु.
➡ स्वीकारलेल्या लाचेची रक्कम:-10,000/-रू
▶️ पडताळणी दिनांक:-17.07.2023
▶️ सापळा दिनांक:- 17.04.2023
➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांचे हॉटेल व लॉजिंगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव व एनओसी प्रमाणपत्र देण्यासाठी 10,000/- रु. लाचेची मागणी केली म्हणून तक्रार प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीनुसार केलेल्या पडताळणीमध्ये यातील आलोसे यांनी ग्रामपंचायतिचा ठराव व एनओसी प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांचे कडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दिनांक 17/07/2023 रोजी सापळा कारवाई मध्ये यातील आलोसे श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर यांनी लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांचेवर सदर बजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरू आहे.
➡️ सापळा पथक : श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर,पोलीस अंमलदार :- पोह/ शिरीषकुमार सोनवणे, पोना /श्रीराम घुगे, पोशि/राजू पवार व चालक राहुल गायकवाड सर्व नेम लाप्रवि, सोलापूर
सर्व ने. अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर.
➡ मार्गदर्शन अधिकारी :- श्री अमोल तांबे ,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे परिक्षेत्र.(मोबाईल क्र. 9922100712)
डाॅ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. (मोबाईल क्र. 9921810357)
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
(गणेश कुंभार)
सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मो.क्र. 9764153999
कार्यालय क्र 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com
Toll free no 1064