Akshay Bhalerao Murder Case : जामखेडमध्ये भिमसैनिकांचा विराट हल्लाबोल मोर्चा, अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, पिडीत कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत करा – जामखेडच्या भिमसैनिकांची मागणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुरोगामी महाराष्ट्र दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. या घटनेत, आंबेडकर जयंती का साजरी केली या कारणावरून अक्षय भालेराव (Akshay Bhalerao murder case Nanded) या दलित युवकाची नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावात जातीयवादी गुंडांनी निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद आज जामखेड शहरात उमटले. बोंढार गावातील घटनेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या नेतृत्वाखालील विराट हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाद्वारे भिमसैनिकांनी आपला आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील अक्षय भालेराव हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील समस्त भिमसैनिकांनी विराट हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले होते. जामखेड शहरातील खर्डा चौकापासून ते तहसिल कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसिल कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा धडकल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी तालुक्यातील भिमसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त करत सदर घटनेचा जोरदार निषेध नोंदवला. यावेळी पार पडलेल्या मोर्चात हातात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि निळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने भिमसैनिक सहभागी झाले होते.
भिमसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मयत अक्षय भालेरावच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी स्विकारला. जामखेड तालुक्यातील समस्त भिमसैनिकांच्या मागण्या शासनाला कळविण्यात येतील अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर मोर्चा संपला.
जामखेडमध्ये पार पडलेल्या विराट हल्लाबोल मोर्चात सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, राजन समिंदर, बापुसाहेब गायकवाड,अनिल सदाफुले, दादासाहेब घायतडक, बापूसाहेब ओव्हळ, आजिनाथ शिंदे, उमरभाई कुरेशी, जुबेरभाई शेख, प्रा.राहुल आहेर,
राजेंद्र सदाफुले, रजनीकांत मेघडंबर, सचिन सदाफुले, बाबा सोनवणे, सनीदादा सदाफुले, डाॅ.सचिन घायतडक, संदेश घायतडक, किशोर सदाफुले,शेखर घायतडक, दिपक घायतडक,किशोर काबंळे,सुर्यकांत सदाफुले, दिनेश घायतडक,संभाजी आव्हाड, सुकेंद्र सदाफुले, राजू घायतडक,अँड.कृष्णा शिरोळे, मंगेश घोडेस्वार, विक्रांत अब्दुले, सोमनाथ आढाव, सनी प्रिन्स सदाफुले, राकेश घायतडक, सोनू सदाफुले, मनोज डाडर, संतोष थोरात, मिलिंद भोसले,सुमित काबंळे, महीला सुरेखा सदाफुले, अरुणा सदाफुले, मालन घायतडक, कुसुम साळवे सह शेकडो भिमसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते.