हर घर तिरंगा अभियान : हळगाव ग्रामपंचायतच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांनी केली रॅलीद्वारे जनजागृती
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा मोहिमेची हळगाव ग्रामपंचायतकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून गावातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी गावामध्ये जनजागृतीपर रॅली काढत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन केले.
प्राथमिक केंद्र शाळा हळगाव, भैरवनाथ विद्यालय हळगाव, गबारवस्ती प्राथमिक शाळा, कापसेवस्ती प्राथमिक शाळा, तुकाईवस्ती प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन गावातून भव्य अशी रॅली काढली होती. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.घरोघरी तिरंगा (हरघर तिरंगा) मोहिमेविषयी विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. शनिवारी सकाळी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, सरपंच अनिताई सुशेन ढवळे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, ग्रामसेविका निलिमा कुबसंगे, तलाठी मुजीब शेख, सुशेन ढवळे, माजी सरपंच राजेंद्र ढवळे, राजु भैय्या सय्यद, ग्रामपंचायत सदस्य अशोक रंधवे, नवनाथ ढवळे, सुभाष कापसे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन पाचरणे, सुनिल ढवळे, रामदास शिंदे, राजेंद्र ढवळे, अंकुश ढवळे सर, अशोक मंडलिक, दादा पुराणे, सह आदी पदाधिकारी तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
हर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रभागाची एक समिती तयार केली जाणार असून यात ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा सेविका सह आदींचा समावेश केला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 700 पेक्षा अधिक घरांवर तिरंगा झेंडा फडकवला जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अवाहन सरपंच अनिताई सुशेन ढवळे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, ग्रामसेविका निलिमा कुबसंगे यांनी केले आहे.