उष्णता वाढली लिंबू महागले, आज किलोला मिळवतोय ‘इतका’ दर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। Lemon market prices today । राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. उन्ह्याच्या काहिलीपासून वाचण्यासाठी नागरिकांचा ओढा लिंबू पाणी (शरबत) पिण्याकडे वाढला आहे. यामुळे राज्यात लिंबाची मागणी वाढली आहे. (Heat rises, lemons become more expensive, Lemon market prices today we are getting Rs 100 per kg)

लिंबू उत्पादकांचे आगार अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यातील हळगाव, पिंपरखेड, अरणगाव, आघी, चौंडी, जवळा, बाकी सह आदी भागातील लिंबू राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागात विक्रीस नेला जात आहे. या भागात उत्पादित होणाऱ्या लिंबाची खरेदी गावागावातल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. वेगवेगळ्या स्थानिक आडत्यांच्या माध्यमांतून लिंबाची खरेदी होत आहे.

लिंबाचे भाव कडाडल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबियांसमवेत लिंबाच्या तोडणीसाठी रणरणत्या उन्हात बागांमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या लिंबाला काही ठिकाणी 90 रूपये तर काही ठिकाणी 100 रूपये दर मिळत आहे. परंतू किरकोळ बाजारात मात्र हेच लिंबू अधिक भावाने विकले जात आहे. एक लिंबू 5  रुपयांपेक्षा अधिक भावाने शहरात विकले जात आहे.

दरम्यान लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या लिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. लिंबाला येत्या काही दिवसांत अधिक भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसवू नये यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.