कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आर्थिक मदत : लवकरच सुरू होणार ऑनलाईन प्रक्रिया
अहमदनगर जिल्ह्यात लवकरच सुरु होणार प्रक्रिया - जिल्हाधिकारी
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मागील दोन वर्षात संपुर्ण देशात कोरोनाने मोठा हाहाकार माजवला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना रूग्णांची मोठी आर्थिक लुटमार झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली होती. लाखो नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले.
कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जावी ही मागणी जोर धरत होती. अखेर केंद्र सरकार (Central Government) मदतीसाठी तयार झाले. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने (Supreme Court order) केंद्र सरकारने मदतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. (heirs of patients who have died of corona will receive financial assistance from maharashtra government: online process will start soon)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक सुचना जारी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की,प्रधान सचिव,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि.12/10/2021 व मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (Department of Public Health) महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/ 2021अन्वये कळविले आहे की,सर्वोच्च न्यायालयाकडील रिट याचिका (सिव्हील) क्र.539/2021 मधील दि. 30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु. 50,000/- सानुग्रह मदत देण्याचे राज्यांना सूचित केलेले आहे.
तसेच मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेव्दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशिल सूचित करण्यात येईल असे कळविले आहे.
अहमदनगर जिल्हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु. 50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती काम पाहणार आहे. या समितीचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) हे अध्यक्ष असणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून (Government of Maharashtra Relief and Rehabilitation Department) अर्ज सादर करण्याबाबतची ऑनलाईन कार्यपध्दती (अर्ज करण्याचे ठिकाण, विहित नमुना इ.) लवकरच अधिसूचित करण्यात येईल. त्याबाबतच्या सूचना प्राप्त होताच स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरीकांनी अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याशी 0241-2323844, 2356940 या नंबरवर किंवा 1077 या टोल फ्री नंबरवर संपर्क करावा. तसेच ddmaahmednagar@gmail.com या इमेल वरही मेल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.