Swarajya Dhwaj | स्वराज्य ध्वज सोहळ्यासाठी ऐतिहासिक खर्डा नगरी झाली सज्ज : पवारांच्या दसरा मेळाव्याची राज्याला उत्सुकता

भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उद्या होणार प्राणप्रतिष्ठापना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) Swarajya Dhwaj | आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक ‘शिवपट्टण’ (shivpattan fort) या भुईकोट किल्ल्याच्या परिसरात (Kharda Bhuikot killa) दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dussehra) बसवल्या जाणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या (Swarajya Dhwaj) कार्यक्रमासाठी खर्डा नगरी (Kharda city) सज्ज झाली आहे. उद्या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी खर्डा ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

मराठ्यांच्या शेवटच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ला परिसरात उद्या सकाळी 09 वाजता दसऱ्याच्या मुहूर्तावर भगव्या स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. कार्यक्रमाची सुरू असलेली जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खर्डा ग्रामस्थ व आमदार रोहित पवार हे उद्या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांचे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. (Historic Kharda city ready for Swarajya Dhwaj celebrations state is eager for Rohit Pawar Dussehra rally)

कार्यक्रमासाठी कोण-कोण उपस्थित राहणार ? उत्सुकता शिगेला

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी कोण कोण येणार यासंबंधी आमदार रोहित पवार यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. उद्या कार्यक्रमात कोण कोणते बडे नेते हजेरी लावतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Historic Kharda city ready for Swarajya Dhwaj celebrations : The state is eager for Rohit Pawar Dussehra rally

असा झाला स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास

महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व  ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने ३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व  इतर पाच राज्यांना भेट दिली आहे. भगवा स्वराज्य ध्वज  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत खर्डा किल्ला परिसरात दिमाखाने झळकताना दिसणार आहे.

स्वराज्य ध्वजाची उंची 74 मीटरच का ?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी  झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे.

Historic Kharda city ready for Swarajya Dhwaj celebrations : The state is eager for Rohit Pawar Dussehra rally

खर्डा किल्ल्याचा इतिहास काय ?

खर्डा किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाचा मराठ्यांनी पराभव करत शेवटचा ऐतिहासिक विजय मिळवला होता.अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे.हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळील खर्डा या ठिकाणी भरभक्कम अवस्थेत उभा आहे

दुर्लक्षित खर्डा शहर झळकणार राज्याच्या नकाशावर

आजवर राज्यातील अनेक किल्ल्यांचा सरकारने विकास केला पण खर्डा किल्ला दुर्लक्षित राहिला होता. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने खर्डा किल्ला हा दक्षिण भारतातून शिर्डी भागात जाणाऱ्या भाविकांसाठी खूप महत्वाचा आहे. आता आमदार रोहित पवार यांनी खर्डा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा देशासमोर आणण्यासाठी किल्ला परिसरात भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारण्याचा केलेला निर्धार आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असलेली स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठापना खऱ्या अर्थाने खर्डा शहर अर्थात खर्डा परिसराचा शौर्यशाली, गौरवशाली इतिहास राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकणारा ठरणार आहे.

राज्यभरातील तरूणाईला लागली खर्ड्याची ओढ…. 

भगव्या स्वराज्य ध्वज यात्रेमुळे राज्यातील सर्वच घटकांमध्ये मोठा उत्साह आहे. राज्यात जिथे जिथे ही यात्रा गेली तिथे तिथे मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत झाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा किल्ला परिसरात स्वराज्य ध्वजाची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याने या कार्यक्रमाची ओढ राज्यभरातील तरूणाईला लागली आहे. उद्या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यातील हजारो तरूणांचे पाय खर्ड्याच्या दिशेने वळले आहेत.

आमदार रोहित पवारांनी निश्चित केले दसरा मेळाव्याचे ठिकाण ?

राज्यात राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दसरा मेळावा हा राजकीय पक्षांसाठी बुस्टर डोस ठरत आलेला आहे. शिवसेना भाजप या पक्षांच्या नेत्यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिलेली आहे.आता आमदार रोहित पवार यांनी मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा किल्ला परिसरात भगवा स्वराज्य ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर उभारण्याचा निर्णय घेत महाराष्ट्रातअगामी काळात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी खर्डा हे ठिकाण निश्चित केल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवीर होत असलेला कार्यक्रम

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारी जिल्ह्यातील 21 गावे लाॅकडाऊन करण्यात आली आहेत.उद्या जिल्ह्यात दसर्‍यानिमित्त जंगी कार्यक्रम होणार आहेत.गर्दी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. आमदार रोहित पवार यांनीही खर्डा येथे होणाऱ्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करण्याचे अवाहन जनतेला केले आहे.

First Publisher : web titel : Swarajya Dhwaj | Historic Kharda city ready for Swarajya Dhwaj celebrations state is eager for Rohit Pawar Dussehra rally