कोरोना काळात कुटुंबांचा आधार गमावलेल्या निराधार भगिनींना शिलाई मशीनचे वाटप

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा उपक्रम

कर्जत । प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्यावतीने कोरोना काळात कुटुंबांचा आधार गमावलेल्या निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच जागतिक पोलिओ दिनानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली.

रोटरी क्लब ही एक सामाजिक काम करणारी जागतिक पातळीवरील संघटना असून समाजाप्रती जाणीव असलेली संघटना आहे. कोरोना काळात कुटुंबातील कर्ता पुरुष गामावलेल्या भागिनींना शिलाई मशिनद्वारे छोटासा आधार देण्याचे काम रोटरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. निराधार कुटुंबाचा उदरनिर्वाह सुकर व्हावा अशी भावना असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते यांनी केले आहे.

रविवार, दि.२४ रोजी रोटरी क्लबच्यावतीने कोरोनामुळे निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप आणि जागतिक पोलिओ दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल मेहत्रे, रोटरीचे सदस्य निवृत वनाधिकारी अनिल तोरडमल, घनश्याम नाळे, नितीन देशमुख, नामदेव गायकवाड, दयानंद पाटील, सुरेश नहार, सचिन धांडे, चंद्रकांत राऊत, रवींद्र राऊत, श्रीराम गायकवाड, गणेश जेवरे, निलेश दिवटे, काकासाहेब काकडे, प्रशांत फलके, नितीन तोरडमल,सदाशिव फरांडे,संतोष सुरवसे, नारायण तनपुरे, संदीप गदादे, राहुल खराडे, सचिन गोरे, उपमन्यु शिंदे, राजेंद्र पठाडे, उत्तम मोहोळकर, विशाल गोडसे, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून जागतिक पोलिओ दिनानिमित्त शहरातून रॅली व मदतफेरी काढण्यात आली याप्रसंगी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.